शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

‘भूमिगत’च्या कामांसह आंबेडकर उद्यानाच्या कामाचे ऑडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 5:00 AM

शहरातील अर्धवट रस्ता कामामुळे अनेक अपघात झाले. न. प.ने २०० कोटी रुपये खर्चून भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना, बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम सुरू केले. मात्र, आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नवीन पाईपलाईनमधून पाणी मिळत नाही. कंत्राटदाराने अद्याप नागरिकांच्या घरी नळ कनेक्शन लावून दिले नाही. कंत्राटदाराचा आर्थिक फायदा करण्यासाठी अंदाजे ९० टक्के बिलाची रक्कमदेखील अदा करण्यात आली. अंदाजे ५ कोटी रुपये खर्च करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम ५० टक्केही पूर्ण झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील तीन वर्षांपासून नागरिक खड्ड्यातून मार्ग शोधत आहेत. न. प.ने सुमारे २०० कोटी रुपयांचे भूमिगत काम हाती घेतले आहे. मात्र, भूमिगतची कामे अद्याप अर्धवट असून, याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे कामही अर्धवट स्थितीत आहे. या सर्व कामांचे स्पेशल ऑडिट करून चौकशी समिती नेमून  दोषी अधिकारी, कंत्राटदार, लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शेखर शेंडे,  एमआयडीसी इंडस्ट्रियलिस्ट  असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी निवेदनातून केली.     शहरातील अर्धवट रस्ता कामामुळे अनेक अपघात झाले. न. प.ने २०० कोटी रुपये खर्चून भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना, बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम सुरू केले. मात्र, आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नवीन पाईपलाईनमधून पाणी मिळत नाही. कंत्राटदाराने अद्याप नागरिकांच्या घरी नळ कनेक्शन लावून दिले नाही. कंत्राटदाराचा आर्थिक फायदा करण्यासाठी अंदाजे ९० टक्के बिलाची रक्कमदेखील अदा करण्यात आली. अंदाजे ५ कोटी रुपये खर्च करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम ५० टक्केही पूर्ण झाले नाही.  जानेवारी २०२१मध्ये ही सर्व कामे पूर्ण करून लोकार्पण होणार होते हे विशेष.भूमिगत गटार योजनेसाठी शहरातील मजबूत सिमेंट रस्ते फोडून चेंबर तयार करीत पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, यात चांगल्या रस्त्याची पुरती वाट लागली. कंत्राटदाराला १०० कोटीच्या कामाचे अंदाजे ८० टक्के देयकदेखील न. प.ने अदा केले. मात्र, अजून ५० टक्केही काम झाले नाही. जी कामे झाली तीदेखील निकृष्ट दर्जाची झाली. एकाही चेंबरची हायड्रो टेस्ट झाली नाही. त्यामुळे शहरातील विकासकामांचे स्पेशल ऑडिट करून चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.

शासन निधीचा दुरुपयोग... n शहरातील सिमेंट रस्ते फोडून थातूरमातूर डागडुजी करून रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र, पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडून रस्ता उखडला. रस्त्याने चालणेदेखील कठीण झाले आहे. याबाबत  नगराध्यक्ष, प्राधिकरणच्या अधिकाऱ्यंकडे अनेकदा तक्रारी करूनही याबाबत कुणी दखल घेतली नाही. संबंधित कंत्राटदार, अधिकारी व पदाधिकारी शासनाच्या निधीचा दुरूपयोग करीत असल्याचा आरोपी शेखर शेंडे आणि प्रवीण हिवरे यांनी चर्चेदरम्यान केला. n इतकेच नव्हे तर संबंधीत कामाची पाहणी करण्यासाठी राज्याच्या सचिव स्तरावरील अधिकारी येऊन गेले. मात्र, कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी केदार यांनी संबंधित कामाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

 

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार