शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोजागिरी संगीतसंध्येत रंगले श्रोते

By admin | Updated: October 15, 2014 23:23 IST

जय महाकाली शिक्षण संस्था, अग्निहोत्री ग्रुप आॅफ इन्स्ट्यिुशन्स, वर्धाद्वारे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता बाबुलाल अग्निहोत्री शैक्षणिक परिसर नागठाणा रोड, सिंदी मेघे वर्धा येथील अग्निहोत्री

वर्धा : जय महाकाली शिक्षण संस्था, अग्निहोत्री ग्रुप आॅफ इन्स्ट्यिुशन्स, वर्धाद्वारे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता बाबुलाल अग्निहोत्री शैक्षणिक परिसर नागठाणा रोड, सिंदी मेघे वर्धा येथील अग्निहोत्री आॅडिटोरियममध्ये कोजागिरी सुरमयी शाम हा संगीत संध्या कार्यक्रम घेण्यात आला. मुंबईचे प्रख्यात गीत, गझल, भजन व जसगायक रविराज यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी कोजागिरीचे पौराणिक महत्त्व विषद केले. मंचावर चंद्रपूर येथील माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी ऊर्फ धन्नू महाराज, संस्था सचिव शिवकुमारी अग्निहोत्री, डॉ. अशोक जैन, बाबाराव महाजन उपस्थित होते. कोजागिरी सुरमयी शामची रंगत प्रख्यात गायक रविराज यांच्या सुरेल स्वरांनी रंगली. सुरुवातीलाच कोजागिरीचे औचित्य साधून रविराज यांनी एक राधा एक मीरा... दोनों ने शाम को चाहा हे गीत सादर करून वातावरणात रंगत आणली. यानंतर खाली मेरी घागर... बडी देर भयी तसेच अशांती चित्रपटातील शक्ती दे मॉ.. शक्ती दे माँ अशी एकाहून एक गाणी सादर केली. तसेच काल के पंजे से माता बचाओ, सच्ची ज्योत वाली माता तेरी जय जयकार... तुने मुझे बुलाया शेरोवाली ये या गाण्यावर उपस्थित श्रोते टाळ्यांच्या निनादात एकरूप झाले. एकापेक्षा एक अशी विविध प्रकारची गाणी सादर करून उपस्थितांकडून दाद मिळविली. नुसरत फतेह अली खान यांचे कितना सोना तेनु, गुलाम अलींची चुपके चुपके रात दिन, आसू बहाना याद है ही गझल, तर जगजितसिंग यांच्या खास शैलीत झुकी झुकी सी नजर... बेकरार है के नही अशा गझलांनी रसिकांना भावविभोर केले. हिंदी गीतासोबतच मराठी गझल सम्राट स्व. सुरेश भट यांची हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही ही गझल जरा जास्तच भाव खाऊन गेली. शेवटच्या टप्प्यात विख्यात शास्त्रीय गायक मन्ना डे यांना स्मरण करून गाणी सादर करण्यात आली. दमा दम मस्त कलंदर या गीतानंतर राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी कोजागिरीचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला शहरातील प्राध्यापक व शिक्षकवृंद व नागरिकांची व महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)