आरोपी अटकेत : हिंगणघाट येथील घटना वर्धा : सकाळी बाहेर शौचास गेलेल्या एका १३ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना हिंगणघाट येथे घडली. या प्रकरणी तक्रारीवरून परिसरातील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सकाळी शौचास गेली असता कबीर वॉर्डातील महेंद्र मनोहर बोरकर (२१) या युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सदर युवतीने घरी येत तिच्या पालकांना सांगितला. यावरून त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी परिसरातील महेंद्रविरूद्ध भादंविच्या कलम ३७६ (२), ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून हिंगणघाट पोलिसांनी त्याला अटक केली. घटनेचा तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)रुग्णवाहिकेमध्ये युवतीचा विनयभंगवर्धा - सावंगी रुग्णालयात सोडून देण्याचे निमित्त करून रुग्णवाहिकेमध्ये युवतीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पालोती ते सावंगी मार्गावर घडली.पोलीस सुत्रानुसार, सदर युवती ही सावंगी रुग्णालयात जात होती. दरम्यान रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा चालक आकाश धोंगडे रा. सावंगी (मेघे) याने तिला रुग्णालयात सोडून देण्याचे निमित्त करून रुग्णवाहिकेत बसविले; परंतु रुग्णवाहिका रुग्णालयाजवळ न थांबवता सरळ पालोती मार्गावर नेवून तिच्याशी असभ्य वर्तवणूक करून तिचा विनयभंग केला. तसेच याबाबत कुणाशी वाचत्या केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीच्या तक्रारीवरून आकाशविरूध्द भांदविच्या कलम ३५४ ब, ५०६ आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेचा विनयभंगवर्धा- घरी मुलीसोबत झोपून असलेल्या महिलेचा एका इसमाने विनयभंग केला. ही घटना सालोड (हिरापूर) येथे शुक्रवारी रात्री ११.४५ वाजताच्या दरम्यान घडली. पीडित महिला घरी झोपली असता गावातील गोपाल नावाच्या इसमाने घराच्या मागच्या बाजूने आत शिरून सदर महिलेचा विनयभंग केला. तक्रारीवरून गोपालविरूध्द सेवाग्राम ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
शौचास गेलेल्या बालिकेवर अत्याचार
By admin | Updated: October 4, 2015 02:52 IST