शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावरून चाकू हल्ला

By admin | Updated: August 19, 2015 02:17 IST

ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावरून सभाध्यक्षासह त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून एका युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना म्हसाळा येथे शनिवारी घडली.

युवक जखमी : म्हसाळा येथील प्रकार वर्धा : ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावरून सभाध्यक्षासह त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून एका युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना म्हसाळा येथे शनिवारी घडली. यात राजेंद्र जुनघरे रा. गाडगेनगर, म्हसाळा नामक युवक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनी म्हसाळा ग्रामपंचायतीची सभा सुरू होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुन्ना यादव होते. सभेत राजेंद्र याने प्रश्न विचारले असता त्याला उत्तर न देता अध्यक्षाने त्याला तुला पाहुन घेतो अशी धमकी दिली. सभा संपल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास राजेंद्र त्याच्या घराकडे जात असताना यादव व त्याचे सहकारी सतीश नानोटकर व रामा आडे यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यात राजेंद्र जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी राजेंद्रचा भाऊ संदीप देवराव जुनघरे याच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर भादंविच्या कलम ३२६, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत.(प्रतिनिधी)