शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात २२ हजार ५३७ हेक्टर पेरण्या झाल्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 23:48 IST

यावर्षी मुरवणी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या दमात केलेल्या पेरण्या यशस्वी झाल्या आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच पेरण्या साधल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिकाची जोपासना करण्यासाठी शेतात निंदणीचे व तणनाशक फवारणी काम सुरू आहे.

ठळक मुद्देशेतकरी समाधानी : कापसाच्या क्षेत्रात यंदा झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी मुरवणी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या दमात केलेल्या पेरण्या यशस्वी झाल्या आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच पेरण्या साधल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिकाची जोपासना करण्यासाठी शेतात निंदणीचे व तणनाशक फवारणी काम सुरू आहे. शेतीच्या कामामुळ े ग्रामीण भागातील महिला व पुरूष मंडळी व्यस्त झाली आहे.तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी झालेल्या खरीप पेरणीमध्ये कपाशी पिकाची लागवड सर्वाधिक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यानंतर त्याला पाहिजे तसेच भाव मिळाले नाही. सुरूवातीला २ हजार पासून २८०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. त्यानंतर ३२०० पासून ३४५० भाव मिळाला. याऊलट कापूस पिकाला सुरूवातीला ४ हजार ते ४६०० नंतर ४७०० ते ६२०० पर्यंत भाव मिळाला. कापसाचे उत्पादन समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास बसला. शिवाय भाव मिळाल्याने जास्त हमी देऊन आर्थिक फायदा झाला.कृषी विभागाचे विस्तार अधिकारी विजय देशपांडे म्हणाले की, सध्या ९१.७७ टक्के खरीप पेरण्या झाल्या आहे. यामध्ये २२ हजार ५३७ हेक्टरवर कुठेही दुबार पेरणी आली नाही. शेतकरी पावसाच्या भरवश्यावर पेरणी करतात सुरूवातीला जूनच्या पंधरवाड्यात करण्यात आलेल्या पेरणी मध्ये ओलिताद्वारे पाणी देण्यात आले आहे.उर्वरीत पिकांची वाढही समाधानकारक आहे. शेतामध्ये तणाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी डवरणी व तणनाशक फवारणीच्या कमी लागले आहे.यावर्षी पीक उत्पादनाला हमीभाव जाहीर झाला आहे. त्यामुळे शाश्वत भाव हक्काने मिळणार आहे. शेतकºयांनी चांगल्या प्रकारे पिकनियोजन केले आहे.निसर्गाने साथ दिल्यास भरघोष उत्पादन होण्याचा अंदाज शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बँकाकडून कर्ज मिळण्यास बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून महागडे बि-बियाणे खते विकत घेवून पेरणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती