शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आष्टी-साहूर राज्यमार्ग खड्डेमय

By admin | Updated: October 2, 2016 00:55 IST

गत तीन दिवसांपासून आष्टीसह तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : तीन दिवसांत बारा अपघातआष्टी (श.) : गत तीन दिवसांपासून आष्टीसह तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले आहे. आष्टी-साहूर राज्य मार्गावर पांढुर्णा फाट्याजवळ ४ बाय ९ मिटर रोडला मोठा खड्डा पडला असून त्यात पाणी साचले. या खड्ड्यामुळे तीन दिवसांत दुचाकीचे १२ अपघात झाले असून बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. याप्रकरणी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गजानन भोरे यांनी निवेदन देत त्वरित खड्डा बुजविण्याची मागणी केली आहे. आष्टी-साहूर मार्ग खड्डेमय झाला आहे. साईडपट्ट्या दोन्ही बाजुने डांबरी रस्त्यापेक्षा वर आल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचते. या खड्ड्यात ३ फुट खोल पाणी साचल्याने दुचाकी, ट्रक, कार चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गाने वरूड, मुलताई, बैतुलकडे शेकडो ट्रक धावतात. दुचाकी दिवसभर सुरू असतात. बारा अपघातात सर्व दुचाकी चालक व सहकारी गंभीर जखमी झाले. सदर रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास बांधकाम विभागाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशाराही गजानन भोरे यांनी निवेदनातून दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)साडेचार कोटींचा खर्च व्यर्थआष्टी-साहूर राज्यमार्गाच्या डांबरीकरणावर दोन वर्षांपूर्वी तीन कोटी तर मागील वर्षी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. या रस्त्यावर दिवसरात्र रहदारी सुरू असते. जड वाहतुकीमुळे रस्त्याच्या कामावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. बांधकामाचा दर्जा सूमार आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येते. डांबरामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ राहत असल्याने वर्षभरामध्ये रस्ता उखडण्याची हमी दिली जात असल्याचेच दिसते. शासनाच्या निधीला चुना लावण्याचे काम सुरू आहे. काम झाल्यानंतर वर्षाअखेरीस रस्ता का उखडतो, यावर विचार करण्याची वेळ आली असताना त्याकडेही कानाडोळाच केला जात असल्याचे दिसते. चांगल्या रस्त्यांसाठी शासन निधी देते; पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा भ्रष्ट ठरत आहे. यामुळेच रस्त्याची वाट लागत आहे.साईडपट्ट्या धोकादायकतळेगाव ते आष्टी, आष्टी ते साहूर या दोन्ही मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या डांबरी रस्त्यापेक्षा वर आल्या आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढत जाते. यामुळे पट्ट्यांचा उतार कसा काढायचा, याचेही नियोजन गरजेचे आहे. अपघाताचे प्रमाण यामुळेच वाढत आहे. एकावेळी दोन वाहने आल्यास दुचाकी चालकाला जाण्यासाठी जागाच राहत नाही. यामुळे अपघात होत आहे. नागरिकांची ओरड बांधकाम विभागाला नित्याचीच झाली असून तेही दुर्लक्षच करतात.आले अधिकारी ठेकेदाराच्या मनारस्ता डांबरीकरणाचे काम सुरू झाल्यावर अधिकारी डांबरी हॉटमिक्स प्लॅन्टवर जात नाही. एकत्र झालेले साहित्य रस्त्यावर टाकले जाते. यामुळे बारा महिन्यात त्याचे बारा वाजतात. अधिकारी उपस्थित राहत नाही. नागरिक ओरडून सांगतात; पण अधिकारी मनावर घेईल तरच ना! रस्त्यांची वाट लागल्यानंतर बांधकाम विभागाला जागा येते. हा प्रकार थांबविणे गरजेचे आहे. शासनाच्या निधीचा योग्यरित्या खर्च करून भ्रष्टाचारमुक्त कामे करावी, अशी रास्त अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत. रस्त्यांची होणारी चाळणी आतातरी थांबवावी, अशी मागणी आष्टी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.