शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकला असद घरी जाण्यासाठी निघाला आणि वाटेत नाल्यातून जाताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 11:55 IST

बुधवारी दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळी थांबला. दरम्यान आजीकडे असलेला असद खान घरी जाण्यास निघाला. त्याचवेळी घरासमोर असलेल्या नाला तुडुंब भरून वाहत होता. त्यामुळे घरात जाण्यासाठी पाण्यामधून त्याने जाण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देहिंगणघाट येथील घटनाकुटुंबीय पोरके

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने नाला दुथडी भरून वाहत होता. नाल्याच्या पुलावरून पाणी असताना जात असलेल्या कवडघाट रोडवरील जुन्या कांजी हाऊसजवळील राहणाऱ्या असद खान रमजान खान पठाण या चार वर्षीय बालकाचा वाहत गेल्याने मृत्यू झाला.बुधवारी दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळी थांबला. दरम्यान आजीकडे असलेला असद खान घरी जाण्यास निघाला. त्याचवेळी घरासमोर असलेल्या नाला तुडुंब भरून वाहत होता. त्यामुळे घरात जाण्यासाठी पाण्यामधून त्याने जाण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळेस त्याच्यासोबत कोणीच नव्हते. आजीच्या घरून निघालेला चार वर्षीय बालक पाण्यातून वाट काढत घरी जाण्यास निघाला. पण, पाण्याचा प्रवाह एवढा होता की तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला. कमीत कमी १५ ते २० फूट अंतरापर्यंत तो वाहत गेला. घराशेजारच्या मागील बाजूला असलेल्या नाल्यात वाहत गेला आणि एका काठीला अडकला. घरामागील असलेल्या नालीकाठची विटांची भिंत पडल्याने मोठा आवाज झाला. काय पडले ते पाहण्यासाठी असदची आई गेली असता मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला.

असदची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. तर त्याला पाच वर्षांची बहीणही आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे वडील कुटुंबीयांना सोडून निघून गेले. आईच मुलांचे पालनपोषण करायची. हा परिसर झोपडपट्टी परिसर म्हणून ओळखला जातो. या झोपडपट्टी परिसरात धड रस्ते नाही, नाल्या नाही. पावसाळ्यात घरामध्ये पाणी साचून राहत असते. अशा परिस्थितीत हे लोक जीवन जगत आहेत. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात