शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगवासाची शिक्षा ठोठावताच पती न्यायालयातून 'छूमंतर', मदिरालयात पेग रिचवताना सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 13:23 IST

शिक्षा ठोठावताच आरोपीने पोलिसांना चकमा देत न्यायालयातून पळ काढला. पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी थेट वडकी येथील एका मदिरालयात सापडला.

ठळक मुद्देहिंगणघाट येथील घटना : खावटीच्या प्रकरणात ठोठावली शिक्षा

हिंगणघाट (वर्धा) : पती-पत्नीचा कौटुंबिक वाद विकोपाला जात प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. न्यायालयानेही गैरअर्जदार पतीस खावटीची रक्कम भरण्याचे आदेश दिले. पण, गैरअर्जदाराने खावटीची रक्कम न भरल्याने अखेर न्यायालयाने गैरअर्जदारास दोषी ठरवून एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. पण, शिक्षा ठोठावताच आरोपीने पोलिसांना चकमा देत न्यायालयातून पळ काढला. पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी थेट वडकी येथील एका मदिरालयात गवसला.

हिंगणघाट येथील रहिवासी असलेल्या स्मिता प्रवीण पाटील यांचा हिंगणघाट तालुक्यातील फुकटा येथील प्रवीण पाटील यांच्याची सुमारे १२ वर्षांपूर्वी विवाह झाला. पण, काही वर्षांनंतर प्रवीण याने पत्नी व मुलांना घराबाहेर काढले. परिणामी, स्मिता यांनी खावटी संदर्भात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही स्मिता पाटील हिला प्रवीण पाटील याने प्रति महिना तीन हजार रुपये खावटी देण्याचे आदेश दिले. पण, प्रवीण याने खावटीची रक्कम नियमित न दिल्याने स्मिताने पुन्हा न्यायालयात धाव घेत न्यायाची मागणी केली.

या प्रकरणी ॲड. इब्राहीम बख्श यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन हिंगणघाट येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी दीपक बोरडे यांनी गैरअर्जदार प्रवीण पाटील यास दोषी ठरवून एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीस ताब्यात घेतले. पण, नंतर आरोपीने मोठ्या हुशारीने पोलिसांच्या हातावरच तुरी देत न्यायालयाच्या आवारातून सोमवारी दुपारी यशस्वी पळ काढल्याने पोलिसांची धावपळ उडाली.

अन् मदिरालयात सापडला

न्यायाधीशांनीही तुरुंगवासाची शिक्षा ठोठावताच मोठ्या हुशारीने प्रवीण पाटील याने पोलिसांच्या हातावर तुरी देत हिंगणघाट येथील न्यायालयाच्या आवारातून यशस्वी पळ काढला. यामुळे पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती. पण पोलिसांनीही 'झुकेगा नही..' म्हणत फरार झालेल्या प्रवीणला शोधून काढले. तो वडकी येथील एका मदिरालयात सापडला.

टॅग्स :Courtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारी