शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के वाहनांच्या नंबरप्लेट जुन्याच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:21 IST

'एचएसआरपी'चा घोळ संपेना : १५ ऑगस्टनंतर जुन्या प्लेटधारकांना होणार दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनधारकांना हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. एप्रिल २०२५ अखेरची मुदत राज्य शासनाने चार महिन्यांनी वाढवून दिल्यानंतरही वाहनधारकांनी अद्याप नंबरप्लेट बसवून घेतलेल्या नाहीत.

दोन लाख ४९ हजार ९६८ वाहनधारकांपैकी ८७ हजार ६२३ जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४४ हजार १३४ जणांनीच नंबरप्लेट बसवून घेतल्या तर ४२ हजार ८१० प्रक्रियेत असून, अद्यापही १ लाख ६२ हजार ३४५ जण जुन्याच प्लेट लावून रस्त्याने धावत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वच वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट अनिवार्य करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यात व देशात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनधारकांना नवी नंबरप्लेट लावून घ्यावी लागणार आहे. तर एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना वितरकांकडूनच एचएसआरपी नंबरप्लेट बसवून दिली (इनबिल्ड) जात आहे.

नंबरप्लेट बदलाचा इतिहासनव्वदच्या दशकापूर्वी (वर्ष १९९०) विहित नमुन्यात काळ्या प्लेटवर पांढरे अक्षरे व अंक लिहून नंबरप्लेट तयार केली जात होती. त्यानंतर दहा वर्षांनी (वर्ष १९९९ ते २०००) नंबरप्लेट पांढरी झाली. अंक, अक्षरे काळी करण्याचा निर्णय झाला. लगेच रंगाने लिखित नंबरप्लेट जाऊन याच कालखंडात रेडियम स्टीकरने नंबरप्लेट लिहिण्याचे बंधन घालण्यात आले. येथूनच चित्रविचित्र नंबरप्लेटचा ट्रेंड वाढत गेला. आता १ एप्रिल २०१९ पासून एचएसआरपी नंबरप्लेटचा नियम अस्तित्वात आलाय.

अन्यथा वाहनांवर दंडकेवळ अधिकृत एचएसआरपी उत्पादकांनी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत मोटार वाहनांसाठी बसवलेली एचएसआरपी वैध मानली जाईल व त्यांची वाहने पोर्टलवर अद्ययावत केली जातील. इतर कोणत्याही साम्य असलेल्या एचएसआरपी उत्पादक, पुरवठादारांकडून एचएसआरपी बसवल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन कायदा व नियमांच्या तरतुदीनुसार एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. 

जिल्ह्यात अडीच लाख वाहनेजिल्ह्यात एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांची संख्याच अडीच लाखांवर आहे. अद्याप जनजागृतीअभावी वाहनधारकांमध्ये नंबरप्लेट बसवण्याबाबत अनभिज्ञता दिसून येतेय. शिक्षित वाहनधारक प्लेटा बसवताय.

१५ ऑगस्ट शेवटची मुदतसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, एचएसआरपी नंबरप्लेटसाठी पूर्वी ३० एप्रिल ही मुदत होती. मात्र, राज्यातील वाहनांची संख्या, नंबरप्लेट लावून देणारी अधिकृत केंद्र व नोंदणी करणारे ग्राहक पाहता, चार महिन्यांची मुदत वाढवून दिली होती. ही मुदत संपली असून, १५ ऑगस्ट शेवटची तारीख असल्याचे जाहीर केले आहे.

येथे करा नोंदणीउच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी बसवण्यासाठी www.transport. maharashtra.gov .in या संकेतस्थळावर एचएसआरपी बुकिंग जाऊन संबंधित पोर्टल लिंकला भेट द्या.

"एचएसआरपी नंबरप्लेट ही वाहनधारकांसाठी फायद्याचीच आहे. मुदतवाढ दिल्यानंतरही बहुतांश वाहनधारकांनी प्लेट बदललेल्या नाहीत. १५ ऑगस्टनंतर प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभाग कारवाईला व दंड आकारणीला सुरुवात करेल."- स्नेहा मेंढे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी. 

टॅग्स :wardha-acवर्धाRto officeआरटीओ ऑफीस