शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना प्रश्न पडतो की, डावीकडून जावे की उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा, दुकानासमोर उभी असणारी वाहने यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर वाहने उभे केली जात असल्याने वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना झाली आहे.

ठळक मुद्देरस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा : नगरपालिका, पोलीस विभागाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरात वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांची स्थिती, अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहन चालकांचा निष्काळजीपणा, वाहनतळाचा अभाव आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे.छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना प्रश्न पडतो की, डावीकडून जावे की उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा, दुकानासमोर उभी असणारी वाहने यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर वाहने उभे केली जात असल्याने वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना झाली आहे. अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक अडथळे पार करीत वाहनधारकांना अमरावतीकडे कसेबसे जावे लागत आहे. वाहनतळाअभावी नागरिक वाटेल तेथे वाहन उभे करतात. वाहन उभे केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, मात्र याचा कुणीच विचार करीत नाही. मुख्य रस्त्यावर वाहन उभे करून चर्चा करणारे अनेक महाभाग शहरात आहेत.शहरातील अनेक ठिकाणे अपघातप्रवण स्थळ झाले आहे. बसस्थानक तसेच एलआयसी कार्यालयासमोर आॅटो, काळीपिवळी व ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे केले जात असल्यामुळे वसंतनगर येथून येणाºया लोकांना मुख्य रस्त्यावरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच साईनगरकडे जाणाºया रस्त्यावर चौकातच हॉटेलसमोर उभी केली जाणारी वाहने, चौकातील गर्दी यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. तरूणांच्या गर्दीमुळे शासकीय विश्राम गृहासमोरसुद्धा बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. शहरातील वाहतूक सुरळीत कशी करता येईल व वाहतुकीच्या समस्या कशी सोडविता येईल याचा विचार करणे गजरेचे झाले आहे. पोलीस विभाग, नगरपालिका व प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी