आर्वीत दहा दिवसात चार पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:12+5:30

शहरातील श्रीराम वॉर्डात भाच्याकडे राहणाऱ्या ७८ वर्षीय व्यक्तीला ३ जुलै रोजी अर्धांगवायुचा झटका आला. अशातच ५ जुलैला घरीच पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. लागलीच त्यांना येथील खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीकरिता पाठविला होता.

In Arvi four positives in ten days | आर्वीत दहा दिवसात चार पॉझिटिव्ह

आर्वीत दहा दिवसात चार पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देउपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू : प्रशासनाची उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : आर्वी शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी श्रीराम वॉर्डातील ७८ वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित आढळून आला असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसामधील हा चौथा रुग्ण असल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तर रुग्णाच्या मृत्यूमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील श्रीराम वॉर्डात भाच्याकडे राहणाऱ्या ७८ वर्षीय व्यक्तीला ३ जुलै रोजी अर्धांगवायुचा झटका आला. अशातच ५ जुलैला घरीच पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. लागलीच त्यांना येथील खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीकरिता पाठविला होता. मंगळवारी सकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान दुपारच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ते कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती मिळताच आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांनी श्रीराम वॉर्डातील परिसर प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केला. त्यांच्या घरातील चार व्यक्ती त्यांच्या निकट संपर्कात आल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण परिसर सील केला जाईल, अशी माहिती तहसीलदार विद्याधर चव्हाण यांनी दिली. मृतकावर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्ध्यातील स्मशाभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: In Arvi four positives in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.