शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरालगतच्या ११ गावांत कृत्रिम ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:27 IST

शहरानजीकच्या ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करीत असून यंदाच्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे उपलब्ध पाण्याचे सध्या योग्य नियोजन केले जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला महिन्याभऱ्याचा स्टॉक संपल्याने सध्या जीवन प्राधिकरणकडे कृत्रिम पाणीबाणी निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे१६ हजार कुटुंबांंना सहा दिवस होणार नाही पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजीकच्या ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करीत असून यंदाच्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे उपलब्ध पाण्याचे सध्या योग्य नियोजन केले जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला महिन्याभऱ्याचा स्टॉक संपल्याने सध्या जीवन प्राधिकरणकडे कृत्रिम पाणीबाणी निर्माण झाली आहे. यामुळे येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत पिपरी (मेघे)सह वर्धा शहरालगतच्या ११ गावांतील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येणार नसल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (नि.), कारला, आलोडी, साटोडा, नालवाडी, म्हसाळा व वरूड या ११ गावांना जीवन प्राधिकरणच्यावतीने पाणीपुरवठा केल्या जातो. शहरानजीकच्या सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय तर वर्धा शहराच्या शेजारीच महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. त्यांनाही जीवन प्राधिकरणच पाणी पुरवठा करते. परंतु, गुरूवार २८ फेबु्रवारीपर्यंत पाणी पुरवठा केल्या जाणार नसल्याने याचा परिणाम सदर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि हिंदी विद्यापीठाच्या अडचणीत भर पडणार आहे. यंदाच्यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्याने भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार वर्धा शहराशेजारच्या ११ ग्रा.पं.तील नागरिकांसाठी १३.०१ द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात आले होते. ते फेब्रुवारी महिना लोटण्यापूर्वीच संपल्याने आणि पाटबंधारे विभाग आता मार्च महिन्यात जलाशयातील पाणी सोडणार असल्याने येत्या २८ फेबु्रवारीपर्यंत जीवन प्राधिकरणद्वारे ११ गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. पाटबंधारे विभागाकडून जलाशयातील पाणी सोडल्यानंतर त्याची उचल करून त्याचा पुरवठा सदर ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबियांना करण्यात येणार आहे.येळाकेळीच्या धामनदीपात्रातून होते पाण्याची उचलजीवन प्राधिकरण विभाग येळाकेळी येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून त्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा पुरवठा पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (नि.), कारला, आलोडी, साटोडा, नालवाडी, म्हसाळा व वरूड या गावांमधील नागरिकांना करते; पण सहा दिवस नळाला पाणी येणार नसल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यातील जलाशयांत २१.८७ टक्के जलसाठाजीवन प्राधिकरणच्यावतीने सध्या दोन दिवसांआड वर्धा शहराच्या शेजारील ११ ग्रा.पं.तील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. असे असले तरी जिल्ह्यातील जलाशयांत सध्या केवळ २१.८७ टक्केच पाणी शिल्लक असून एप्रिल महिन्यात जलसंकट गडद होण्याची करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने दोन दिवसाआड नागरिकांना पाणी पुरवठा सध्या करण्यात येत आहे. फेबु्रवारी महिन्याचा स्टॉक संपल्याने आणि उपलब्ध पाणी पावसाळा सुरू होण्यापर्यंत पुरवायचे असल्याने वर्धा शहराशेजारच्या ११ गावांमधील नागरिकांना २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार नसून जीवन प्राधिकरणकडून जलाशयातील पाणी सोडण्यात आल्यावर त्याची उचल करून नागरिकाना पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.- व्ही. पी. उमाळे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा.

टॅग्स :Waterपाणी