शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धानोली (मेघे) येथे कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:21 IST

धानोली (मेघे) येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला मुबलक पाणी असताना वॉर्ड क्र. ३ या गरीबांच्या वसाहतीत नळाला पाणीच येत नाही. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य पाईपलाईनचा लिकेज व्हॉल्व्ह गाठून महिलांना पाणी भरावे लागत आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून पितात दूषित पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : धानोली (मेघे) येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला मुबलक पाणी असताना वॉर्ड क्र. ३ या गरीबांच्या वसाहतीत नळाला पाणीच येत नाही. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य पाईपलाईनचा लिकेज व्हॉल्व्ह गाठून महिलांना पाणी भरावे लागत आहे. तब्बल तीन महिन्यांपासून या नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.१५०० लोकवस्ती असलेल्या गावात एकूण तीन वार्ड आहेत. पाणी पुरवठ्याची मुबलक पाण्याची विहीर व जलकुंभ आहे. दोन वॉर्डात पाणीपुरवठा करताना भर उन्हाळ्यात सांडपाण्याच्या नाल्या धो-धो वाहत असून हजारो लिटर पाणी वाया जाते; पण वार्ड क्र. ३ या गरीबांच्या वस्तीत पाण्याच्या थेंबासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. ग्रा.पं. च्या दुर्लक्षामुळे या वॉर्डात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सरपंच व ग्रामसेवकांनी अनेक कामांत गैरप्रकार करून खोटी देयके लावून पैसे उचलले. ही बाब चौकशी अधिकाºयांच्या तपासणीत सिद्ध झाली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत सत्यता आढळल्याने सरपंच व ग्रामसेवकांवर कार्यवाहीची टांगती तलवार आहे. पोलिसांत गुन्हाही दाखल होणार आहे. यामुळे सरपंच व ग्रामसेवकाने गावाला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. विहिरीवरून पाण्याच्या टाकीत गेलेल्या पाईपलाईनवरील एका लिकेज व्हॉल्व्हवर पायपीट करीत महिला व नागरिकांना पाणी आणावे लागते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी धानोलीच्या ग्रामस्थांनी केली आहे.भ्रमणध्वनी स्वीच आॅफगावातील पाणीटंचाईबाबत ग्रामसेवक व सरपंच यांचे मत जाणून घेण्याकरिता संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी स्वीच आॅफ दाखवित होता.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई