शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

‘लोकरंग’मधून घडले महाराष्ट्रातील कलांचे दर्शन

By admin | Updated: January 4, 2015 23:19 IST

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या गीत आणि नाटक विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्र पुणेच्या कलाकारांनी महाराष्ट्राचा लोकरंग कार्यक्रम सादर केला.

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या गीत आणि नाटक विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्र पुणेच्या कलाकारांनी महाराष्ट्राचा लोकरंग कार्यक्रम सादर केला. यावेळी कलाकारांनी महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे सादरीकरण केले. कलाकारांनी गण, गौळण, भारूड, गोंधळ, अभंग, वाघ्या-मुरळी, वासुदेव इत्यादी लोककलांचे दर्शन आपल्या अभिनय आणि नृत्यांच्या माध्यमातून घडविले. गीत आणि नाटक विभागाचे उप-निदेशक धृव अवस्थी आणि व्यवस्थापक किरण कुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनात २० हून अधिक कलाकारांचा जत्था विद्यापीठात दाखल झाला होता. पथक प्रमुख संध्या लोंढे व पंकज दाभाडे यांच्या नेतृत्वात हे कलाकार आपल्या कला सादर करतात.कार्यक्रमाची सुरुवात गणपती गजवदना गौरीच्या नंदना या गिताने झाली. यानंतर खंडेरायाच्या लग्नाला, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, वाजले की बारा अशा एकाकून एक गीत आणि नृत्यांची बहारदार पेशकश करीत कलाकारांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दिलफेक संवाद आणि हास्यविनोद यावेळी पहावयास मिळाले. एकाहून एक सरस अशा लावण्या सादर करून उपस्थितांना ठेका धरण्यास बाध्य केले. आपल्या कलेतून त्यांनी स्वच्छ भारत अभियान, घरकूल योजना, प्रौढ शिक्षण, दारूबंदी आणि व्यसनमुक्तीचा संदेशही दिला. हे कलाकार परभणी, नांदडे, सातारा, मिरज येथून आले होते. कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र आणि प्रकुलगुरू प्रा. चित्तरंजन मिश्र यांनी कलाकारांचे स्वागत करून त्यांना प्रमाणपत्र दिले. संचालन नाट्यकला व फिल्म अध्ययन विभागाचे प्रा. सुरेश शर्मा यांनी केले. डॉ. सतीश पावडे आणि जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.(स्थानिक प्रतिनिधी)