शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

बाप्पाचे पावसासह आगमन

By admin | Updated: September 18, 2015 01:50 IST

बाप्पा.. सर्वांचे लाडके दैवत. बाप्पाच्या स्वागताकरिता अनेकजण आतूर झाले होते. अशात गुरुवारी बप्पाचे आगमन झाले. घरोघरी दहा दिवसांकरिता बाप्पाची स्थापना झाली.

अनेकांची तारांबळ : पावसामुळे ढोल-ताशांच्या आनंदावर विरजण वर्धा : बाप्पा.. सर्वांचे लाडके दैवत. बाप्पाच्या स्वागताकरिता अनेकजण आतूर झाले होते. अशात गुरुवारी बप्पाचे आगमन झाले. घरोघरी दहा दिवसांकरिता बाप्पाची स्थापना झाली. उत्तम पावसाकरिता अनेकांचे असलेले साकडे पूर्ण करीत बाप्पाने मुसळधार पावसाला घेऊनच दमदार आगमन केल्याने शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले. गणेशाच्या स्वागताकरिता महिन्याभरापासून अनेकांकडून तयारी सुरू होती. आज ढोल-ताश्यांच्या निनादात बाप्पाची आपल्या घरी स्थापना करावी, अशी अनेकांची इच्छा होती. मात्र पावसाच्या हजेरीने त्यावर विरजण पडले. पहाटे ३ वाजतापासून पावसाने हजेरी लावल्याने बाप्पाला आपल्या घरी कसे न्यावे याची अनेकांना काळजी पडली होती. काहींनी छत्रीचा तर काहींनी प्लास्टिकच्या पन्नीचा आधार घेतला. सुरू असलेल्या पावसात सकाळी बाप्पाला घरी नेतांना अनेकांना चांगलीच कसरत करावी लागल्याचे चित्र दिवसभर बघायला मिळाले. दुपारी पावसाने थोडी उसंत घेतली होती. शेतकऱ्यांसह नागरिक या पावसाने सुखावले. मात्र बाप्पाच्या स्वागताकरिता आपण केलेली तयारी या पाण्यामुळे कुचकामी ठरली अशा प्रतिक्रीयाही बऱ्याच जणांनी दिल्या. वाहन मुषक असले तरी आज बाप्पा दुचाकी व कारमूधन प्रवास करताना दिसले. दिवसभरानंतर दुपारी पावसाने उसंत घेताच अनेकांनी घाई करीत जसे जमेल तसे बाप्पांना घरी आणून स्थापना करणे पसंत केले.पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे बाजारात गणेशमूर्ती विक्रीकरिता आलेल्या व्यवसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे चित्र बाजारात होते. यासोबतच सार्वजनिक मंडळांचीही चांगलीच अडचण झाली. काही गणेश मंडळांनी ‘वॉटरफ्रूट’ मंडप तयार न केल्यामुळे त्यांना लगबगीने ही सोय करावी लागली. मंडप डेकोरेशन व्यावसायिकांचे भावही वधारले होते. असे असले तरी बाप्पाचे पावसासह झालेले आगमन सुखावणारे ठरले.(प्रतिनिधी)सावंगीत ११ फूट उंच शाडूच्या गणेश मूर्तीची स्थापनासावंगी येथे राधिकाबाई मेघे स्मृती ट्रस्टद्वारे आयोजित गणेशोत्सवाला कुलपती दत्ता मेघे, शालिनी मेघे, आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते श्रीगणेशाच्या स्थापनेने प्रारंभ झाला. या महोत्सवानिमित्त १२ दिवसांच्या काळात वैद्यकीय, दंत व आयुर्वेद रूग्णालयांद्वारे विशेष आरोग्य तपासणी शिबिरे व जनजागृतीपर उपक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलपती दत्ता मेघे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. अभिमत विद्यापीठाच्या परिसरात गरूडासनावर आरूढ ११ फूटांची शाडूची श्रीगणेशमूर्ती स्थापित करण्यात आली आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूने महाराष्ट्राचे कुलदैवत विठ्ठल रूक्मिणी, तुळजा भवानी, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहे. रौप्य महोत्सवी वर्षाची पूर्तता करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवाचाही शुभारंभ यावेळी झाला. या संपूर्ण शैक्षणिक परिसरात नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली असून मनोवेधक सजावट, सप्तरंगी कारंजी, झगमगणारी भव्य प्रवेशद्वारे यांनी हा परिसर सजविण्यात आला आहे.