शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मांडगाव बँक ऑफ इंडियाच्या शाखेचा मनमानी कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:10 IST

खातेधारकांत रोष : बँकेकडून केली जाते अवाजवी वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क मांडगाव : येथील बँक ऑफ इंडिया शाखेत गेल्या काही महिन्यांपासून मनमानी कारभार सुरू असून खातेधारकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. येथील बँकेचे व्यवहार मागील काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात असून खातेधारकांकडून अवाजवी वसुली केली जात असल्याची ग्राहकांत ओरड आहे.

मांडगाव येथील ग्रामपंचायतचे लिपिक उमेश विहिरकर हे १९ ऑगस्ट रोजी कामासाठी बँक पासबुक एन्ट्रीची प्रिंट मारायला गेले. मागील काही दिवसांपासून प्रिंटिंग मशीन बंद असल्याने पर्याय म्हणून बँक खात्याचे स्टेटमेंट मागितले. त्याचे शुल्क पडतील असे सांगण्यात आले. स्टेटमेंटची गरज असल्याने त्यांनी शुल्क भरून स्टेटमेंट देण्यात आले. मात्र तेही बँकेच्या विना विना सही शिक्याचे, आश्चर्य म्हणजे ७ पानांच्या स्टेटमेंट साठी तब्बल ८८५ एवढी रक्कम आकारण्यात आली.

हद्द तर तेव्हा झाली याच बँकेच्या जाम शाखेत काही ग्रामपंचायत कर्मचारी स्टेटमेंट करिता गेले असतांना Hello Wardha ३०४ ट्रान्झेक्शनच्या एन्ट्री स्टेटमेंट करिता १७७ रुपये आकारण्यात आले. त्याचप्रमाणे २८४ ट्रान्झेक्शनचे १७७, १८४ ट्रान्झेक्शनचे १७७ याप्रमाणे आकारण्यात आले. ३०४ ट्रान्झेक्शनचे स्टेटमेंट फक्त ४ पेजेसवर देण्यात आले. एकाच बँकेच्या २ शाखांमध्ये वेगवेगळे दर आकारण्यात येतात का? असा प्रश्न ग्राहकांकडून विचारण्यात येत आहे. या प्रकराची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

कर्ज प्रकरणात घेतली जाते दलाली? "बँक ऑफ इंडियाच्या मांडगाव शाखेत जो लुटमारीचा प्रकार सुरू आहे हा भयानक आहे. अनेक कर्ज प्रकरणात दलाली घेतल्याशिवाय कर्ज प्रकरणे सेटल होत नाही, त्याचप्रमाणे लहान सहान कामाला सुद्धा पंधरा पंधरा दिवस लावले जातात. ही परिस्थिती सुधरायला पाहिजे."- हेमंत पाहुणे, संचालक कृउबा समिती समुद्रपुर

या प्रकाराची चौकशी करा "मी सुशिक्षित तरुण असून माझ्याशी असे घडते, तर अशिक्षित खातेधारकांकडून किती रुपये वसूल केल्या जात असेल याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी." -उमेश विहिरकर, अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी युनियन

"आम्ही जे चार्जेस आकारले आहे ते झोनल ऑफिसला विचारून आणि सर्क्युलर प्रमाणेच आकारण्यात आले आहे. त्यात वैयक्तिकरीत्या काहीच करता येत नाही. जाम शाखेने शुल्क कमी का घेतले ते मी नाही सांगू शकत नाही."-किरण मोरे, शाखा प्रबंधक बँक ऑफ इंडिया मांडगाव

टॅग्स :wardha-acवर्धा