अवास्तव देयके पाठवून महावितरणची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:11+5:30

लॉकडाऊनच्या काळात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीतील घरगुती वीज आकारणीची देयके देवळी व परिसरातील ग्राहकापर्यंत पोहोचलीच नाही. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे ग्राहकांच्या घरापर्यंत दर महिन्याला जात मीटर रिडींग न घेतल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. कोरोना संक्रमणातच महावितरणची देखभाल व दुरुस्ती कामे सुरू असताना ग्राहकांच्या मीटरचे रिडींग न घेण्यामागचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

Arbitrariness of MSEDCL by sending unrealistic payments | अवास्तव देयके पाठवून महावितरणची मनमानी

अवास्तव देयके पाठवून महावितरणची मनमानी

Next
ठळक मुद्देग्राहक आंदोलनाच्या पवित्र्यात : तीन महिन्यांचे एकमुस्त देयक दिल्याने सर्वसामान्याची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : लॉकडाऊनच्या कालावधीत वीजमहावितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांच्या घरगुती मीटरचे रिडींग न घेता त्यांच्या हाती तीन महिन्याचे एकमुस्त देयक थोपविण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. त्यातच तीन महिन्यांच्या देयकाचे युनिट एकत्र करून व त्यानुसार विजेच्या आकारणीचे दर ठरवून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे गोंधळलेल्या ग्राहकांनी महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवून तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचा जाब विचारून आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
लॉकडाऊनच्या काळात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीतील घरगुती वीज आकारणीची देयके देवळी व परिसरातील ग्राहकापर्यंत पोहोचलीच नाही. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे ग्राहकांच्या घरापर्यंत दर महिन्याला जात मीटर रिडींग न घेतल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. कोरोना संक्रमणातच महावितरणची देखभाल व दुरुस्ती कामे सुरू असताना ग्राहकांच्या मीटरचे रिडींग न घेण्यामागचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. महावितरणने एप्रिल महिन्यापासून वीज आकारणीचे नवीन दर निर्धारित केले आहे. या दरानुसार १०० युनिटपर्यंत प्रतियुनिट ३ रुपये ४६ पैसे व यानंतर ३०० युनिटपर्यंत ७ रुपये ४३ पैसे याप्रमाणे टप्प्याटप्प्याने एक हजार युनिटपर्यंत वीज आकारणी वाढीव दर लावून स्लॅब टाकण्यात आले. त्यामुळे दर महिन्याला सरासरी १०० युनिटपर्यंत वीज खर्च करणाºया घरगुती ग्राहकाला तीन महिन्यांचे ७०० ते ८०० युनिटचे देयक देऊन तसेच याप्रमाणे वीज आकारणीचे दर ठरवून विजेची देयके देण्यात आली. त्यामुळे नागरिकांत गोंधळाची स्थिती निर्माण होऊन महावितरणच्या लूटमार धोरणाबाबत रोष व्यक्त होत आहे. कोरोना महामारीच्या संक्रमणात कामधंद्याअभावी आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांचे या कंपनीने कंबरडेच मोडले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

लॉकडाऊन काळातील वीज देयक माफ करा
पुलगाव : महाराष्टÑ वीज वितरण कंपनीने कोरोनाच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीजबिले दिली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शासनाने देयकातील अधिभार, वहन कर व स्लॅब कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन पुलगाव येथे सहाय्यक अभियंता पुरी व नायब तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळा शहागडकर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष श्याम देशमुख, राजेश पाटणकर, कॉँग्रेसचे अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर, तसेच डॉ. विजय राऊत, नाना माहुरे, नरेश ठाकूर, विनोद बाभुळकर उपस्थित होते.

महावितरण कंपनीचे वतीने अव्वा सव्वा विद्युत बिले पाठवून घरगुुती ग्राहकांची लूट केली जात आहे. याबाबत ग्राहकमंच, वीज नियामक मंडळ यांच्याकडे याबाबतची तक्रार नोंदविली जाणार आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या सोबत बोलून बिल आकारणीचे प्रकरण त्यांचे लक्षात आणून दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची या बिलामुळे अडचण होणार आहे.
- रामदास तडस, खासदार,वर्धा .

Web Title: Arbitrariness of MSEDCL by sending unrealistic payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.