शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दीड दशकात ॲनोफिलीस जातीच्या डासांनी घेतले सहा बळी

By महेश सायखेडे | Updated: April 25, 2023 17:22 IST

आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे ठरते फायद्याचे

वर्धा : मलेरिया म्हणजेच हिवताप. हा एक संसर्गजन्य आजार असून, मलेरिया हा आजार ॲनोफिलीस जातीचा बाधित डास चावल्यामुळे होतो. डासांद्वारे संक्रमित होणाऱ्या आजारांपैकी मलेरिया सर्वांत धोकादायक मानला जातो. मागील दीड दशकात वर्धा जिल्ह्यात मलेरिया या आजाराची ४ हजार ४१९ व्यक्तींना लागण झाली. तर याच काळात तब्बल सहा व्यक्तींचा मलेरियामुळे मृत्यू झाल्याचे वास्तव असून, त्याबाबतची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. कीटकजन्य आजारांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचे ठरते. तसे आवाहन आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांकडूनही केले जाते.कसा होतो मलेरिया?

संबंधित डास जेव्हा चावतो तेव्हा प्लाज्मोडियम परजीवी हे त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. नंतर परजीवी रक्तामधून त्या व्यक्तीच्या यकृतात प्रवेश करतात. परजीवी रक्तात मिसळून त्या व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशींना बाधित करतात, असे सांगण्यात आले.मलेरियाचे प्रकार

प्लाज्मोडियम वायवॅक्स, ‎प्लाज्मोडियम ओवेल, ‎प्लाज्मोडियम फैल्सिपैरम, प्लाज्मोडियम मलेरिया हे चार मलेरियाचे प्रकार असल्याचे सांगण्यात आले.

मलेरियाची लक्षणे

थंडी वाजून ताप येणे, ‎थांबून-थांबून अधिक ताप येणे, ‎डोकेदुखी, मळमळ व उलट्या, पोटदुखी, जुलाब व अतिसार होणे, नाडीची गती जलद होणे, सांध्यांमध्ये वेदना होणे, अंगदुखी, शरीरात वेदना होणे ही मलेरियाची प्राथमिक लक्षणे आहेत.कुठल्या वर्षी किती मृत्यू?

* २००८ : ०१* २०११ : ०१* २०१२ : ०२* २०१५ : ०२

मलेरिया हा कीटकजन्य आजार असून, लक्षणे असलेल्या व्यक्तीने कुठलाही घरगुती उपाय न करता नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. कीटकजन्य आजारांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचे ठरते. नागरिकांनीही आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.

- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूwardha-acवर्धा