लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे भाजीपाला पिकाचे भाव पडल्याने अनेक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी पिकात चक्क जनावरे सोडली. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे.जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील चिकणी (जामणी), पढेगाव, वर्धा तालुक्यातील चितोडा, बरबडी, सेवाग्राम, सेलू काटे, पवनार, तिगाव व अन्य भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकाची लागवड करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला. पहिल्या टप्प्प्यात १४, नंतर ३० एप्रिल आणि ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. मार्च-एप्रिल आणि हे तीन महिने लग्नसराईचा हंगाम असतो. या हंगामाची तयारी म्हणून जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वांगी, कारली, टमाटर, भेंडी, चवळी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली. यंदा मात्र, लग्नसमारंभांसह सर्वच सोहळ्यांवर कोेरोनाचे सावट होते. त्यामुळे भाजीपाल्याला फारशी मागणी नसल्याने भाव पडले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना १५ किलोची भाजीपाल्याची कॅरीबॅग १० रुपये इतक्या कवडीमोल भावात विकावी लागली. यात लागवडीचा दूर वाहतुकीचाही खर्च निघणे अवघड झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी एक ते पाच एकरात लागवड केलेल्या भाजीपाला पिकांत चक्क जनावरे सोडली.दलालांनीही खरेदीकडे फिरविली पाठभाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. मात्र, भावच नसल्याने दलालांनी शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरविली. स्वत:च्या जबाबदारीवर भाजीपाला विक्रीसाठी आणा, असे दलालांकडून सांगणत आले. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. यात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची थेट ग्राहकांनाच विक्री केली.फळपिकालाही कवडीमोल भावजिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कलिंगड, डांगर आदी हंगामी फळपिकांची लागवड करतात. मात्र, कलिंगड, डांगर या फळपिकांनाही पाच ते सहा रुपये किलो इतका कवडीमोल भाव असल्याने अनेक फळ उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिकाची थेट ग्राहकांना विक्री केली. तर भावच नसल्याने तोडणीअभावी अनेकांचे फळपीक शेतातच सडत राहिले.चरितार्थासाठी स्वीकारला भाजी विक्री व्यवसायकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे लघु व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. शहरातील अनेक ऑटोरिक्षा चालक, कापड व इलेक्ट्रॉनिक्स, भांडी दुकानात रोजंदारीने नोकरी करणारे तरुण, चहा टपरीचालक, पानटपरी व्यावसायिक, अंडी, पाणीपुरी विक्रेते आदींनी चक्क भाजी आणि फळ विक्रीचा अस्थायी व्यवसाय स्वीकारला. शहरात अनेक रस्त्याच्या कडेला हातमाडीच्या माध्यमातून हे व्यावसायिक भाजीपाला, फळविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते.
भाजीपाला पिकात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST
पहिल्या टप्प्प्यात १४, नंतर ३० एप्रिल आणि ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. मार्च-एप्रिल आणि हे तीन महिने लग्नसराईचा हंगाम असतो. या हंगामाची तयारी म्हणून जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वांगी, कारली, टमाटर, भेंडी, चवळी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली. यंदा मात्र, लग्नसमारंभांसह सर्वच सोहळ्यांवर कोेरोनाचे सावट होते.
भाजीपाला पिकात सोडली जनावरे
ठळक मुद्देमातीमोल भाव : शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले