राजगृहावरील तोडफोडीचे जिल्ह्यात संतप्त पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:05+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी दोन अज्ञात समाज कंटकाकडून तोडफोड करण्यात आली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करून राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी राज्य सरकारने समाज कंटकांवर कारवाई करावी अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांकडून करण्यात आली आहे.

Angry repercussions of vandalism on Rajgriha in the district | राजगृहावरील तोडफोडीचे जिल्ह्यात संतप्त पडसाद

राजगृहावरील तोडफोडीचे जिल्ह्यात संतप्त पडसाद

googlenewsNext
ठळक मुद्देठिकठिकाणी निदर्शने : आंबेडकरी संघटनांकडून कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/हिंगणघाट : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी दोन अज्ञात समाज कंटकाकडून तोडफोड करण्यात आली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करून राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी राज्य सरकारने समाज कंटकांवर कारवाई करावी अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांकडून करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए.) यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांच्या नेतृत्वात घटनेचा निषेध करण्यात आला. स्थानिक बजाज चौकाजवळ कार्यकर्त्यांनी एकत्रित होऊन वर्धा पोलीस ठाण्याला या संदर्भात निवेदन सादर केले. यावेळी समाधान पाटील, बाबा बडगे, सुनील वनकर, राजू थूल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी हिंगणघाटच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देवून या घटनेचा निषेध करण्यात आला. राजगृहावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वंबआचे नेते डॉ.उमेश वावरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांना निवेदन दिले. यावेळी मनीष कांबळे, दिलीप कहुरके, राजेश खानखुरे, प्रदीप डोळस, प्रमोद पाटील, दिक्षित वाघमारे, रमेश मानकर, आकाश हेडाऊ, महेंद्र वासेकर, शैलेंद्र नारनवरे, जीवन उरकुडे, सतीश जवादे, नितीन मैदलवार आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए.) यांच्यावतीने हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या लोकांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी रिपाइंचे अध्यक्ष शंकर मुंजेवार, दौलत मून, चंद्रशेखर दिक्षित, मोतीराम मून, राजू मेंढे, भीमराव कुुंभारे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे घटनेचा निषेध
वर्धा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक वास्तू राजगृह या निवासस्थानी दोन समाज कंटकांनी तोडफोड केली. भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या घटनेचा तीव्र निषेध करीत आंदोलन केले. या दोन माथेफिरूना त्वरित अटक करून शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलन भूमिपुत्रचे संयोजक रितेश घोगरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, प्रवीण काटकर, प्रमोद राऊत, सचिन घोडे, विवेक लोहकरे, पंकज इंगोले, प्रवीण पेठे, समीर राऊत, स्वप्नील किटे,अभिजीत कुत्तरमारे, वैभव राऊत, अर्चित निगडे, निशिकांत विरखेडे, सचिन गौरकर, प्रशिक कांबळे, महेंद्र मेश्राम, सुमित डेकाटे, मिलिंद निमिसडकर,मयुर भुजबळ आदी उपस्थित होते.

Web Title: Angry repercussions of vandalism on Rajgriha in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.