शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

अन् १४ मिनिटात पोलीस पथक घटनास्थळी

By admin | Updated: November 25, 2015 06:08 IST

राज्य शासनाने राज्यभरातील महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी तिला तत्काळ घटनास्थळीच पोलीस मदत मिळावी,

जिल्हा पोलिसांची १०९१ हेल्पलाईन सक्रिय : राज्याच्या ‘१०३’ क्रमांकाच्या हेल्पलाईनचा भंडाफोड लोकमत चमू ल्ल वर्धाराज्य शासनाने राज्यभरातील महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी तिला तत्काळ घटनास्थळीच पोलीस मदत मिळावी, या उदात्त हेतूने ‘१०३’ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. ही हेल्पलाईन खरेच महिलांवरील अत्याचार रोखण्याचे काम करीत आहे वा नाही, या हेल्पलाईनच्या माध्यमातून आतापर्यंत किती महिलांना घटनास्थळी पोलीस मदत मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी जागतिक महिला अत्याचारविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी वर्धा लोकमत चमूने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता राज्य शासनाचा ‘१०३’ हा हेल्पलाईन क्रमांकच अस्तित्वात नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या उलट वर्धा पोलिसांनी सुरू केलेला ‘१०९१’ हा हेल्पलाईन क्रमांक सक्रिय आहे. तक्रार करताच केवळ १४ मिनिटांत वर्धा पोलीस पथकांनी घटनास्थळ गाठून आपली सजगता दाखविल्याचेही या निमित्ताने पुढे आले. उल्लेखनीय, वर्धा पोलिसांनी जिल्ह्यातील महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी १०९१ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. या क्रमांकावर एका बनावट तक्रारकर्त्यामार्फत संपर्क साधला असता केवळ १४ मिनिटांत पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. यातून वर्धा पोलीस महिलांवरील अत्याचार रोखण्याकरिता तत्पर असल्याचे दिसून आले आहे.सर्वत्र महिलांवरील अत्याचार वाढत असून ते रोखण्याकरिता पोलीस विभाग सपशेल नापास ठरत असल्याचे समोर आले. या अपयशाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना घटना झाल्यानंतर त्याची माहिती मिळते. जर घटना घडण्यापूर्वी किंवा वेळीच त्याची माहिती मिळाली तर त्यावर आळा बसविणे शक्य असल्याचे समोर आले. यावर मार्ग म्हणून राज्य शासनाच्यावतीने एक हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १०३ हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला. यावर सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या परिसरात घडत असलेल्या घटनांची माहिती क्षणात पोलिसांपर्यत पाहोचणे अपेक्षित होते. मात्र वास्तविकतेत सत्य काही औरच असल्याचे समोर आले शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली ही हेल्पलाईन अस्तित्त्वातच नसल्याचे लोकमतच्या स्टींग आॅपरेशन मधून समोर आले आहे. जिल्ह्यात १०३ या क्रमांकावर दूरध्वनी केला असता तो क्रमांक लागता लागेना. यामुळे जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता असा कोणताही क्रमांक महिलांवरील अत्याचार रोखण्याकरिता अस्तित्त्वात असल्याची माहिती त्यांना नसल्याचे समोर आले आहे. या क्रमांकाबाबत खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.‘१०९१’ वर मिळाली १४ मिनिटांत मदत ‘लोकमत’च्यावतीने ‘१०९१’ या क्रमांकावर दुपारी १२.३४ वाजता पोलीस कंट्रोल रूमपासून सुमारे सहा किमी अंतरावर असलेल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाजवळील सुनसान रस्त्यावर एका मुलीची छेड काढण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. कॉल करताच येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने तक्रार करणाऱ्याचे नाव नोंदवून घेतले. त्यांनी लगेच तक्रारकर्त्याकडून घटनास्थळाची सविस्तर माहिती नोंदवून घेतली. क्षणातच तक्रार करण्याकरिता वापरण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकाचे ‘लोकशन’ घेण्यात आले. या कार्यलयातून जिल्ह्यात असलेल्या महिला पथक व शहर ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती दिल्याच्या पाच मिनिटांनी म्हणजे १२.३९ वाजता शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक एस.एस. बिसंदरे यांचा तक्रारकर्त्याच्या भ्रमणध्वनीवर कॉल आला. त्यांनी घटनास्थळ व घडत असलेल्या प्रकाराची माहिती घेतली. यानंतर १२.४७ वाजता महिला पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक ममता अफुने यांचा तक्रारकर्त्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल आला. त्यांनीही घटनास्थळ व सुरू असलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. लगेच पोलीस कंट्रोल रूममधून १२.४८ वाजता फोनवरून मदत मिळाली अथवा नाही याची शहानिशा करण्यात आली. त्यांचा फोन येताच शहर पोलीस, महिला पथक व चार्ली पथकाचे कर्मचारी १२.४८ वाजता घटनास्थळी दाखल झाले. या काळात पोलीस मुख्यालयाचा या तीनही पथकाशी बिनतारी यंत्रणेवर संपर्क सुरू असल्याचे दिसून आले. सदर तीनही पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना जिल्ह्यात महिलांच्या रक्षणाकरिता पोलीस सजग आहेत काय, याची चाचपणी करण्याकरिता हा प्रकार केल्याचे सांगताच या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. यावेळी त्यांना विचारले असता त्यांनी ‘१०९१’ क्रमांकावर माहिती येताच याच पद्धतीने त्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगितले. यातून वर्धेत महिलांच्या वा युवतींच्या मदतीकरिता ही हेल्पलाईन तात्काळ मदतीकरिता येत असल्याचे समोर आले. वर्धा पोलिसांच्या १०९१ बाबतही जागृतीचा अभावजिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात असलेल्या १०९१ या क्रमांकावर वर्षभरात केवळ आठ तक्रारी आल्याचे सांगण्यात आले. ही हेल्पलाईन वर्धेत १ डिसेंबर २०१४ रोजी सुरू झाली. याची माहिती अद्यापपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याची या निमित्ताने उघड झाली. या क्रमांकाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, याकरिता महिला पथकाच्या वाहनावर तो क्रमांक लिहिलेला आहे. शिवाय पोलीस विभागाचे अधिकारी ज्या सार्वजनिक कार्यालयात जातात तिथे या क्रमांकाची माहिती देत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र ही बाब जनजागृतीच्या दृष्टीने नसल्याचेही या स्टींग आॅपरेशनमधून पुढे आले आहे. इतर कुठेही या हेल्पलाईनची जनजागृती करण्यात आल्याचे दिसून आले नाही. केवळ हेल्पलाईन सुरू करून पोलीस मोकळे झाल्याने दिसून आले.काही पोलिसांच्या मते, १०३ आरोग्य सेवेची हेल्पलाईनजिल्ह्यात कार्यरत असलेल्या काही ठाणेदारांना १०३ या क्रमांकाबाबत विचारणा केली असता तो क्रमांक पोलीस विभागाशी निगडीत नसून ही हेल्पलाईन आरोग्य विभागाची असल्याचे सांगण्यात आले.तरीही ती बंद आहेअशाप्रकारे होते कार्यवाहीमहिला व ज्येष्ठांकरिता असलेल्या या ‘१०९१’ क्रमांकावर मदतीकरिता दूरध्वनी केला असता प्रथम तक्रारकर्त्याचे नाव नोंदवित घटनास्थळाची माहिती घेण्यात येते. यानंतर तर माहिती महिला पथक व घटनास्थळ येत असलेल्या हद्दीतील पोलीस ठाण्याला ती देण्यात येते. लगेच दूरध्वनी क्रमांक पोलीस कंट्रोल रुमला देण्यात येतो. येथून तक्रारकर्त्याशी सतत संपर्क सुरू असतो. माहिती मिळताच पोलीस यंत्रणा कामाला लागते.बनावट तक्रारीची शक्यता कमी ‘१०९१’ हा क्रमांक अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने कार्य करीत आहे. येथे येणाऱ्या फोन कॉलची इतंभूत माहिती ‘आॅनलाईन’ गोळा होत असल्याने येथे बनावट तक्रारी येण्याची शक्यता फार कमी आहे.वर्धेत पोलिसांचे महिला पथक सज्जमहिलांच्या मदतीकरिता जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने महिला सुरक्षा पथक निर्माण केले आहे. या पथकाला एक वाहन देण्यात आले आहे. यात एका महिला पोलीस निरीक्षकासह दोन महिला कर्मचारी व दोन पुरूष कर्मचारी देण्यात आले आहे. या पथकाला महिलांच्या समस्या सोडविण्याकरिता सदैव तत्पर राहण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशनदि. २२ नोव्हेंबरला दुपारी १२.०३ वाजता पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून राज्य शासनाच्या ‘१०३’ क्रमांकाबाबत विचारणा केली असता त्यांनी हा क्रमांक वर्धा जिल्ह्यात अस्तित्वात नसल्याचे सांगितले. त्यांनी वर्धा पोलिसांनी ‘१०९१’ ही हेल्पलाईन सुरू असल्याचेही सांगितले.दुपारी १२.०७ वाजता परत शहानिशा करण्याकरिता राज्य शासनाच्या ‘१०३’ क्रमांकावर संपर्क केला. मात्र हा क्रमांक बंदच होता.पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या ‘१०९१’ क्रमांक ‘डायल’ केला. रिंग गेली. १०९१ : नमस्कार हेल्पलाईन नंबर १०९१.तक्रारकर्ती : एक मुलगा एका मुलीला त्रास देत आहे. तिची छेड काढत आहे.१०९१ : तुम्ही कुठे आहात? तक्रारकर्ती : रिंग रोड, हिंदी विद्यापीठाच्या गेटपासून काही अंतरावर.१०९१ : नाव सांगा?तक्रारकर्ती : नाव सांगितले.१०९१ : तो मुलगा नेमके काय करीत आहे. तुमचा नंबर लोकेशन ट्रॅकवर आहे. तुमच्यापर्यंत मदत पोहचली जाईल.यानंतर फोन ठेवण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक एस.एस. बिसुंदरे : (तक्रारकर्तीला) तुम्ही आहात कुठे? आम्ही पाच मिनिटात पोहचतो आहे. ती मुलगी तुमच्या जवळपासच आहे का? तक्रारकर्ती : होय. नंतर फोन ठेवला.महिला पथक उपनिरीक्षक ममता अफुने : आम्ही विद्यापीठाच्या गेटपर्यंत पोहचलेलो आहे. तुम्ही उभ्या असलेली नेमकी दिशा सांगा? तक्रारकर्ती : देवळीकडे जाणाऱ्या मार्गाने या. आम्ही तिथेच आहे. नंतर फोन ठेवला. (तेव्हा कंट्रोल रुमचा फोन वेटींगवर होता.) पोलीस कंट्रोल रूम : आमचे पथक निघालेले आहे. तुमच्यापर्यंत पोहचले काय?तक्रारकर्ती : नाही, पण त्यांचा फोन आला होता. माझे बोलणे झाले. (नंतर फोन ठेवला.)पुन्हा पोलीस उपनिरीक्षक एस.एस. बिसुंदरे : आम्ही ‘लोकेशन’पर्यंत पोहचलो आहोत. तुम्ही कुठे उभ्या आहात.तक्रारकर्ती : तुमची गाडी दिसत आहे. त्याच दिशेने पुढे या. पुन्हा पोलीस कंट्रोल रूम : पथक तुमच्यापर्यंत पोहचले का? तुम्हाला मदत मिळाली का? (तेवढ्यात दुपारी १२.४८.१४ वाजता पोलीस पथकच घटनास्थळी पोहचले.)पथक दाखल होताच त्यांनी शहानिशा सुरु केली. मात्र कुठेही काहीही अनुचित प्रकार घडला नव्हता. तेव्हा पथकाला १०९१ या क्रमांकाच्या हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर पीडित महिलेला किती वेळात मदत मिळू शकते. याची शहानिशा करण्यासाठी ‘लोकमत’ने हे स्टींग केल्याचे सांगताच त्यांचा जीव भांड्यात पडला.जिल्ह्यात १०३ क्रमांक बंद आहे. शासनाकडूनही तो सुरू झाला नसावा. तसे झाले असते तर पोलीस कंट्रोल रूममध्ये तो सुरू झाला असता. तो क्रमांक सुरू नसला तरी जिल्ह्यात महिलांच्या समस्या निराकरणाकरिता १०९१ कार्यरत आहे. महिलांकरिता तयार करण्यात आलेल्या पथकाशी हा क्रमांक सदैव संपर्कात असतो. त्यांच्याकडे तक्रार आल्यास समस्यांचे निकारण करण्याकरिता पथकाकडून तात्काळ कार्यवाही होते.- अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा.