शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने अनियंत्रित कार दुसऱ्या कारवर धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

एम. एच. ३२ ए. एस. ०६८७ क्रमांकाची कार वर्धेकडून   नागपूरकडे जात होती. दरम्यान, माहूर येथे देव दर्शनासाठी जात असलेल्या एम. एच. ४० सी. ए. ४२६७ क्रमांकाच्या कारचा नागपूर-यवतमाळ मार्गावरील मामा-भांजा दर्गाह समोर उजव्या बाजूचा समोरील टायर फुटल्याने ती कार अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली आणि चक्क वर्ध्याकडून नागपूरकडे जाणाऱ्या एम.एच. ३२ ए. एस. ०६८७ क्रमांकाच्या कारवर जाऊन धडकली.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : भरधाव कारचा समोरील टायर फुटल्याने कार दुभाजकावर जाऊन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कारवर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात सातजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.१७) सकाळी १०.३६ वाजण्याच्या सुमारास वर्धा-नागपूर रस्त्यावर असलेल्या मामा-भांजा दर्गाह समोर झाला. अपघातात  गंभीर जखमी झालेल्यांत  रमेशराज कपाटे (६०), शिला कृष्णराज कपाटे (५५), चेताबाई कपाटे (७०), कोमल कृष्णराज कपाटे (२१), योगेश कपाटे (२५) सर्व, रा. पारशिवणी जि. नागपूर यांचा समावेश आहे. तर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कारमधील दोन जखमींची नावे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाली नव्हती.प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ३२ ए. एस. ०६८७ क्रमांकाची कार वर्धेकडून   नागपूरकडे जात होती. दरम्यान, माहूर येथे देव दर्शनासाठी जात असलेल्या एम. एच. ४० सी. ए. ४२६७ क्रमांकाच्या कारचा नागपूर-यवतमाळ मार्गावरील मामा-भांजा दर्गाह समोर उजव्या बाजूचा समोरील टायर फुटल्याने ती कार अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली आणि चक्क वर्ध्याकडून नागपूरकडे जाणाऱ्या एम.एच. ३२ ए. एस. ०६८७ क्रमांकाच्या कारवर जाऊन धडकली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेला पाचारण करून सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारांसाठी पाठविले. तर देव दर्शनाला जाणाऱ्या कपाटे कुटुंबातील सदस्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली.  अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कारचा चक्काचूर झाला. तीन जखमींना बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, अनोदर्शी भैसारे, दीपक भगत, दिनेश वाणी, राहुल काशिकर, राहुल खोब्रगडे यांनी रुग्णालयात पाठविण्यासाठी मदत केली. अपघाताची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 

टॅग्स :Accidentअपघात