शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

कोरोनाकाळातील आर्थिक फटका सहन करत असतानाच महागाईचा मारही बसत आहे. यामध्ये अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याला २५ रुपयांनी वाढत आहेत. या सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशावर दरोडाच घातला असून ते दर हजाराचा आकडा पार जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. अशातच एजन्सीमध्ये जाऊन सिलिंडर घेतल्यास मूळ दरात उपलब्ध होते. तर घरपोच आणून देण्याकरिता अतिरिक्त वीस रुपये आकारले जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्येही गॅस सिलिंडर आता अत्यावश्यक झाला आहे. सणासुदीचे दिवस असतानाच या महिन्याच्या सुुरुवातीलाच सिलिंडरची २५ रुपयांनी दरवाढ झाली असून ग्राहकांना ९३६.५० रुपयांमध्ये सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. सध्या सिलिंडर हजारांच्या घरात पोहचली असतानाही काही डिलिव्हरी बॉयकडून सिलिंडर घरपोच आणून देण्याकरिता वीस रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे ही अतिरिक्त लूट कशाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोरोनाकाळातील आर्थिक फटका सहन करत असतानाच महागाईचा मारही बसत आहे. यामध्ये अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याला २५ रुपयांनी वाढत आहेत. या सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशावर दरोडाच घातला असून ते दर हजाराचा आकडा पार जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. अशातच एजन्सीमध्ये जाऊन सिलिंडर घेतल्यास मूळ दरात उपलब्ध होते. तर घरपोच आणून देण्याकरिता अतिरिक्त वीस रुपये आकारले जातात. ही शहरातील स्थिती असून ग्रामीण भागातील परिस्थिती यापेक्षा वेगळीच आहे. ग्रामीण भागात तर सिलिंडरवर शंभर ते दीडशे रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची ओरड होत आहे.

वर्षभरात २०० रुपयांची वाढ

सिलिंडरची दरमहा २५ रुपयांनी वाढ होतांना दिसत आहे. जानेवारी महिन्यांमध्ये ७४६ रुपयांत मिळणारे सिलिंडर सप्टेंबर महिन्यात ९३६.५० रुपयांमध्ये विकत घ्यावे लागत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासून जवळपास १९० रुपयांनी दरवाढ झाली आहे. सर्वाधिक दरवाढ मार्च महिन्यात झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत दर कायम असताना मार्चमध्ये एकदम १०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दरमहा २५ रुपयांची दरवाढ सुरु आहे.

डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी?

सिलिंडरचा वापर नित्याचाच झाल्याने सिलिंडरचे दर वाढले तरीही सिलिंडर विकत घ्यावेच लागते. एजंन्सीतून सिलिंडर आणले तर पावतीवर असलेले दरच आकारले जाते. परंतु घरपोच सिलिंडर आणण्याकरिता डिलिव्हरी बॉयकडून अतिरिक्त वीस रुपये घेतले जाते. या वीस रुपयांची कोणतीही पावती दिली जात नाही.- सारिका कडू, गृहिणी

सिलिंडरचे दर दरमहिन्याला वाढत असून महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आता सिलिंडर हजार रुपयांच्या घरात असताना घरपोच आणण्याकरिता डिलिव्हरी बॉयकडून वीस रुपये अतिरिक्त घेतले जातात. याची विचारणा केली असता ते द्यावेच लागतात असे सांगतात. याकडे एजंन्सीच्या संचालकांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.- देवश्री चव्हाण, गृहिणी 

वितरक काय म्हणतात?

सिलिंडरच्या किंमती दर महिन्याला वाढत आहे. अजुनही सिलिंडरचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार ग्राहकांच्या नावाने फाडलेल्या पोच पावतीवर जितकी रक्कम लिहिली असेल तेवढीच रक्कम डिलिव्हरी बॉयला देणे आवश्यक आहे. काही ठिकाणी ग्राहकांकडून वरच्या माळ्यावर सिलिंडर पोहचवून मागितले जाते, अशा वेळी काही डिलिव्हरी बॉय अतिरिक्त पैसे घेत असतीलही. परंतु आम्ही सिलिंडरच्या किंमती शिवाय अतिरिक्त पैसे आकारत नाही, असे वितरकांकडून सांगण्यात आले आहे.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर