शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहनचालकांनो सावधान; होऊ शकतो दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 06:00 IST

डॉ. आंबेडकर उद्यान जवळील ट्रॅव्हल्स पॉईंट येथून नागपूरला जाणारे प्रवासी वाहन इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक- आदीत्य मेडीकल्स-शिवाजी चौक-धुनिवाले मठ या मार्गाने परतीचाही प्रवास याच मार्गाने करतात. तर खाद्य निगम गोदाम बरबडी येथे यवतमाळ, पुलगाव या रोडने येणारे ट्रक हे आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल-बजाज चौक-इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक, गांधी पुतळा चौक मार्गे जाणे-येणे करतात.

ठळक मुद्देपोलिसांची करडी नजर : चार ठिकाणांहून वाहतूक वळती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील विविध भागात सध्या रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंटीकरण, काही महत्त्वाच्या चौकांच्या सौंदर्यीकरणासह सिमेंट नाल्यांची निर्मितीचे काम केले जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शहरातील महत्त्वाच्या चार चौकातील जड वाहतूक इतर मार्गांनी वळती करण्याचे निश्चित केले आहे. सदर निर्णयावर पुढील एक महिना अंमलबजावणी करण्यात येणार असून नियमाला बगल देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.स्थानिक बजाज चौक भागात राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक आहे. याच ठिकाणाहून जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा येथून जिल्ह्याच्या चारही कोपऱ्याच्या दिशेने बसेस सोडल्या जातात. रापमच्या बस स्थानकातून आर्वी, नागपूर, सेवाग्राम मार्गे समुद्रपूर, उमरेड तसेच ग्रामीण भागात जाणारे बसेस या इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक-आदीत्य मेडिकल्स-शिवाजी चौक-आर्वी नाका-धुनिवाले मठ-गांधी पुतळा चौक यामार्गे जात असून येणारे बसेस सुद्धा याच मार्गे रापमच्या बसस्थानकात येतात. तसेच डॉ. आंबेडकर उद्यान जवळील ट्रॅव्हल्स पॉईंट येथून नागपूरला जाणारे प्रवासी वाहन इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक- आदीत्य मेडीकल्स-शिवाजी चौक-धुनिवाले मठ या मार्गाने परतीचाही प्रवास याच मार्गाने करतात. तर खाद्य निगम गोदाम बरबडी येथे यवतमाळ, पुलगाव या रोडने येणारे ट्रक हे आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल-बजाज चौक-इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक, गांधी पुतळा चौक मार्गे जाणे-येणे करतात. परंतु, येत्या काही दिवसांवर दुर्गा उत्सव असून या दरम्यान शहरात मोठी वर्दळ राहते. शिवाय रात्रीच्या सुमारास देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दीही होते. असे असतानाही सध्या विविध विकास कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. सदर विकास कामांच्या निमित्ताने ठिकठिकाणी खोदकामही होत आहे. त्यामुळे अनेक मार्गांवर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होतो. उत्सवादरम्यान विविध विकास कामेही पूर्ण व्हावी तसेच वाहतूक व्यवस्थाही कायम रहावी या उद्देशाने वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेने वर्धा शहरातील काही महत्त्वाच्या चौकातील जड वाहनांची वाहतूक इतर ठिकाणाहून वळती केली आहे. या पर्यायी व्यवस्थेच्या नियोजनबद्ध कार्यक्रमावर ३० ऑक्टोबरपर्यंत प्रभावीपणे काम केले जाणार आहे.जड वाहनांसाठी अशी आहे पर्यायी व्यवस्थापूर्वी बजाज चौकातून ट्रक, ट्रॅव्हल्स आणि रापमची बस नागपूर, आर्वी व सेवाग्रामच्या दिशेने जाण्यासाठी बजाज चौक-इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक मार्गक्रमण करीत होती. परंतु, आता या वाहनांना बजाज चौक, आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल, सावंगी टि-पॉईंट, जुनापाणी चौक, आर्वी नाका, धुनिवाले मठ चौक मार्गक्रमण करून पुढील प्रवास करावा लागणार आहे.नागपूरकडून येणारे जड वाहने पूर्वी धुनिवाले मठ-आरती चौक-शिवाजी चौक-आदीत्य मेडिकल्स-पोस्ट ऑफिस चौक होत बजाज चौक पर्यंत होती. तर आता या वाहनांना धुनिवाले मठ-आरती चौक-गांधी पुतळा चौक- डॉ. आंबेडकर पुतळा चौक-पोस्ट आॅफीस चौक-बजाज चौक मार्गक्रमण करावे लागणार आहे.आर्वीकडून येणारे वाहने पूर्वी जुनापाणी चौक- आर्वी नाका चौक-शिवाजी चौक-आदीत्य मेडीकल्स- पोस्ट ऑफिस चौक होत बजाज चौक पर्यंत येत होती. तर आता या जड वाहनांना जुनापाणी चौक-आर्वी नाका चौक- धुनिवाले मठ- आरती चौक- गांधी पुतळा चौक- डॉ. आंबेडकर पुतळा चौक-पोस्ट ऑफिस चौक-बजाज चौक यावे लागणार आहे.बरबडी येथील खाद्य निगम गोदामातून जड वाहनांना पूर्वी गांधी पुतळा-डॉ.आंबेडकर पुतळा-पोस्ट ऑफिस चौक होत वर्धा शहरात येता येत होते. परंतु, आता या वाहनांना गांधी पुतळा-आरती चौक- धुनिवाले मठ-डोडाणी चौक-येथून बायपास ने सावंगी टी-पॉईंट प्रवास करावा लागेल.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस