शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोझरी शेकापुरात दारूविक्रेत्यांची दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:07 IST

मोझरी (शेकापूर) येथे मागील कित्येक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या दारूविक्री सुरू आहे. सोबतच दारूविक्रेत्यांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दादागिरीमुळे सर्वसामान्यांना जगणे अवघड होऊन बसले आहे. स्थानिक पोलिसांचे या प्रकाराला अभय आहे. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी जिल्ह्याचे ाालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या तक्रारीतून केली आहे.

ठळक मुद्देदारूचा महापूर : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मोझरी (शेकापूर) येथे मागील कित्येक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या दारूविक्री सुरू आहे. सोबतच दारूविक्रेत्यांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दादागिरीमुळे सर्वसामान्यांना जगणे अवघड होऊन बसले आहे. स्थानिक पोलिसांचे या प्रकाराला अभय आहे. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी जिल्ह्याचे ाालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या तक्रारीतून केली आहे.जिल्ह्यात दारूबंदी आहे. असे असताना शहरासह ग्रामीण भागात खुलेआम दारूविक्री होताना दिसते. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. अवैध दारूविक्रीला पोलिसांचेच अभय असल्याचा आरोप केला जात आहे.मोझरी (शेकापूर) येथे आशीष राजकुमार भगत, सोनू राजकुमार भगत, मंगेश डोमाजी हे मागील कित्येक वर्षांपासून गावात राजरोसपणे दारूविक्री करीत आहे. त्यामुळे तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दारूविक्रेत्यांचे गावात दहशत पसरविणे, कुणालाही शिवीगाळ, मारहाण करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहे. कित्येकवेळा दारूविक्रेते भाडोत्री गुंड आणून गावात दहशत पसरवितात. मात्र, पोलिसांकडून केवळ पैशाच्या हव्यासापोटी कारवाई केली जात नाही. बीट जमादार दारूविक्रेत्यांची पाठराखण करीत असल्याने दारूविक्री जोमात सुरू असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. कारवाईच होत नसल्याने दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले आहे. ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. दारूविक्रेत्यांचा आता पोलीस अधीक्षकांनीच कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर सरपंच पुष्पा येरणे, उपसरपंच शुभ्रबुद्ध कांबळे, सदस्य लक्ष्मीकांत ढुमणे, आशा मून, शारदा भोयर, सूर्यकांत गजबे, संजय तेलंग, आशा मून, शारदा भोयर, शरद मांढरे, राजू धोबे, वसंत तुंडलवार, मुकिंदराव कांबळे, संजय कारामोरे, राजू कांबळे यांच्यासह १७८ नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.ठराव, शाळेच्या तक्रारीकडे पोलिसांचा कानाडोळागावात होत असलेल्या अवैध दारूविक्रीविरुद्ध २४ जून रोजी सर्वानुमते ठराव घेण्यात आला. याशिवाय विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाने या गंभीर बाबीकडे तक्ररीद्वारे लक्ष वेधले. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामसभेच्या ठरावाची प्रत सादर करण्यात आली. मात्र अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने दारूविक्रीला शासन आणि प्रशासनाची मूकसंमती असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी