जि.प. एम्प्लॉईज बॅँकेच्या देवळी शाखेतील प्रकारदेवळी : जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-आॅपरेटीव्ह बॅँकेच्या देवळी शाखेचा एका एजंटने अपहार केला होता. या प्रकरणी चौकशी सुरू असून तो अपहार कोट्यवधीच्या घरात असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनेक खातेदारांची यामध्ये फसगत झाल्याने बॅँकेत रांगा लागुन आपल्या ठेवींची त्यांच्याकडून शहानिशा सुरू आहे. या एजंटने शहरातील अनेक व्यापारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांचे खाते काढले. अनेक वर्षांपासून त्याचे व्यवहार असल्याने अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; नंतर मात्र या एजंटने घोळ करीत अनेक खातेदारांना गंडा दिल्याचे समोर आले. काहींचे खातेच न उघडता त्याने मोठ्या ठेवी हडप केल्या. तर काहींचे खाते उघडून सुध्दा जमा केलेल्या ठेवी बॅँकेत न भरता लंपास केल्या. एजंट चौधरी याने केलेला हा सर्व व्यवहार बॅँकेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या संगनमतातून करण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार असली तरी आरोप असलेले सर्वांनी अटकपूर्व जामीन मिळविला आहे. शेतकऱ्यांना घातला गंडा एजंट चौधरी याने या घोळाव्यतिरिक्त कास्तकारांचा कापूस चढ्या भावाने विकत घेवून त्यांच्या हातावर तुरी दिल्याचे तपासात समोर येत आहे. काही दिवसापूर्वी कापसाचे बाजार भाव ४ हजार ७०० रुपये असताना या एजंटने ५ हजार २०० रुपयांचा दर देत व्यवहार केले; परंतु या सर्व व्यवहाराचे लाखो रुपये शेतकऱ्यांना मिळाले नाही. यामुळे शेतकरीही त्याच्या मागावर आहेत.
‘त्या’ एजंटचा अपहार कोट्यवधीच्या घरात
By admin | Updated: May 16, 2016 02:15 IST