शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पदव्युत्तर शिक्षणानंतर थाटला रस्त्याच्या कडेला व्यवसाय

By admin | Updated: March 29, 2015 02:03 IST

शिक्षण एमए, एमएसडब्ल्यू, पेशा व्यवसाय अन् तोही रस्त्याच्या कडेला चार चाकी बंडीवर फास्टफुड विक्री.

श्रेया केने वर्धाशिक्षण एमए, एमएसडब्ल्यू, पेशा व्यवसाय अन् तोही रस्त्याच्या कडेला चार चाकी बंडीवर फास्टफुड विक्री. प्रथमदर्शनी वाचताना या दोन्ही वाक्यात विरोधाभास वाटत असला तरी ही सत्यकथा आहे, एका युवकाची! रस्त्याच्या कडेला चारचाकी बंडी उभी करून खाद्यपदार्थांची विक्री करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारा हा युवक म्हणजे किरण मोकदम होय़शिक्षण डबल डिग्रीपर्यंत झाले असतानाही नोकरी मिळत नव्हती. नोकरी लागण्यासाठी द्यावे लागणारे पूरेसे भांडवल जवळ नसल्याने त्याने सरळ व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले़ घरची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने भांडवलाची तजविज करणे सहज शक्य नव्हतेच. मित्रांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीतून एक चारचाकी घेऊन बॅचलर रोडवरील शाळेच्या परिसरात त्याने खाद्यपदार्थ विक्री सुरू केली. आपले शिक्षण पदव्युत्तर असताना रस्त्याच्या कडेला विक्री करण्याबाबत कोणतीच बुज त्याने राखली नाही. नोकरीच्या शोधात वेळ घालविण्यापेक्षा अंगभूत कौशल्याचा वापर करून स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यास मिळकत होते. फक्त थोडी मेहनत, जीद्द आणि संयम राखण्याची गरज आहे, हाच निर्धार करून किरणने फास्टफुड विक्रीचा निर्णय घेतला. रोज सायंकाळी येथे युवा वर्गासह खवय्यांची गर्दी होते. उच्च शिक्षणानंतर नोकरी न मिळाल्याने वैफल्यग्रस्त युवकांकरिता नावाप्रमाणेचे तो खरोखरच आशेचा ‘किरण’ ठरला आहे.सध्याच्या काळात फास्टफुडची चलती आहे़ महानगरीय जीवनशैलीचा भाग असलेल्या या पदार्थांचे लोण सर्वदूर पसरले आहे़ विशेषकरुन युवा वर्गात याला असलेली पसंती पाहता याच पदार्थांच्या विक्रीकरिता निवड केली. यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किरणने एका उपाहारगृहात काम करून तेथील पद्धत जाणून घेतली. यात त्यांच्या सुशिक्षित पत्नीचीही साथ मिळत असल्याने आता दिवसाला त्यांना ५०० ते ८०० रुपयांची मिळकत होते.प्राणिमात्रावर निस्सिम प्रेम असलेले किरण हे नित्याने भटक्या कुत्र्यांकरिता अन्नपदार्थ गोळा करून त्यांना खायला घालतात.