अधिकारी दिसेना : ग्रामस्थांची पायपीट सुरूचतळेगाव (श्या.पं.) : नागरिक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी येथे तलाठी कार्यालयात आठवड्यातून एक दिवस नायब तहसीलदारांना स्थान देण्यात आले. याचे रितसर उद्घाटनही झाले; पण तेव्हापासून अधिकारी फिरकलेच नाही. यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची पायपीट थांबलीच नाही. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. स्थानिक तलाठी कार्यालयात आठवड्यातून एक दिवस नायब तहसीलदाराचे कार्यालय आहे. हे कार्यालय दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले; पण उद्घाटन झाल्यापासून नायब तहसीलदार आलेच नाहीत. आठवड्यातून एक दिवस येथील कार्यालयात नायब तहसीलदार यांनी येऊन या परिसरातील शेतकरी लाभार्थी व विद्यार्थ्यांच्या कामाचा निपटारा करावा. रेंगाळलेली कामे निकाली काढावी, अशा सूचना होत्या. यासाठी आठवड्यातून एक दिवस द्यावयाचा होता; पण अधिकारी येतच नसल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित असून पायपीट थांबलेली नाही. आष्टी तालुक्यातील तळेगाव ही सर्वात मोठी ग्रा.पं. आहे. नागरिकांच्या सुविधेखातर सुरू केलेले नायब तहसीलदार कार्यालय सध्या शोभेचेच ठरतेय. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
नायब तहसीलदार कार्यालय उद्घाटनानंतर कुलूपबंदच
By admin | Updated: July 5, 2015 01:22 IST