शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अखेर अधीक्षकाच्या अतिरिक्त पदभाराचा गुंता सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:24 IST

अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक या रिक्त पदाच्या अतिरिक्त कार्यभाराचा गुंता दोन दिवसात सोडवून वेतनाचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा म.रा.शि.प.तक्रार समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालक, कोषागार अधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांना दिला होता. या आदोलनाचा धसका घेत अधीक्षक पदाचा गुंता सोडविण्यात आला.

ठळक मुद्देआंदोलनाचा दणका : शिक्षक परिषद तक्रार समितीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक या रिक्त पदाच्या अतिरिक्त कार्यभाराचा गुंता दोन दिवसात सोडवून वेतनाचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा म.रा.शि.प.तक्रार समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालक, कोषागार अधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांना दिला होता. या आदोलनाचा धसका घेत अधीक्षक पदाचा गुंता सोडविण्यात आला.१ नोव्हेंबर रोजी रिक्त झालेल्या अधीक्षक पदाचा अतिरिक्त प्रभार ५ नोव्हेंबरला शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून त्याच कार्यालयातील मुख्य लिपीकाकडे सोपविला. परंतु सदर प्रभार हा राजपत्रित अधिकाऱ्यांकडे दिला नाही. या सबबीखाली कोषागार अधिकारी यांनी माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे वेतन देयक स्विकारण्यास नकार दिला. याबाबत शिक्षण उपसंचालक यांचेशी चर्चा केली असता, दुसरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने हा प्रभार दिल्याचे संघटनेने सांगितले. प्राप्त माहितीनुसार नागपूर विभागातील इतर काही जिल्ह्यात अशा प्रकारचा अतिरिक्त पदभार दिलेला असून कोषागार कार्यालयाकडून कोणती हरकत घेण्यात आलेली नाही. या सर्व गुंतागुंतीमुळे जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाºयांचे वेतन १ तारखेला करण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे.विशेष म्हणजे १ व २ जुलै २०१६ रोजी २० टक्के अनुदानासाठी पात्र घोषीत विना अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी मिळू शकले नाही. त्यामुळे म.रा.शि.प. तक्रार निवारण समितीच्यावतीने निवेदन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे लगेचच अधिक्षक पदाचा गुंता सोडविण्यात आल्याचे अजय भोयर यांनी सागिंतले.निवेदन देताना तक्रार निवारण समिती व विना अनुदानित शाळा कृती समितीचे पुंडलिक नागतोडे, संजय बारी, गजानन साबळे, मुकेश इंगोले, दिपक कदम, विनय मुलकलवार, सुनील गायकवाड, मनीष मारोडकर, निलेश डहाके, रमेश पोराटे, दत्ता राऊळकर, अमित प्रसाद, मनीष गावंडे, प्रवीण घोडखांदे, रवी चौधरी, प्रनोज बनकर, दिलीप मारोटकर, गजानन मलकापूरे, सरोज तिवारी, संतोष जगताप, नरेश कुटेमाटे, विजय बावरे, मंगेश धुर्वे, सारंग परिमल, इवनाथे, पांडे आदी उपस्थित होते.