शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

आंदोलनानंतर वृक्ष वाचविण्यासाठी पर्यायाचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

दत्तपूर ते नालवाडी व आरती चौक ते गांधी चौक ते सेवाग्राम या १२ किलोमीटरच्या रस्त्याचे हायब्रीड अंन्युटी मोड अंतर्गत कॉक्रीट चौपदरीकरणाचे काम मंजूर असून प्रगतीत आहे. या १२ किलोमीटरच्या रस्त्याचे दरम्यान सुमारे २५०० झाडे आहेत. मात्र ही झाडे वाचविण्यात आली असून रस्त्याच्या मध्ये येणारी १७० झाडे काढणे आवश्यक आहे. यासाठी वनविभाग, सेवाग्राम आणि नालवाडी ग्रामपंचायत तसेच नगरपरिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे.

ठळक मुद्देशांतिपथ मार्गाची रूंदी कमी करण्याची मागणी : पर्यावरणवाद्यांची आक्रमक भूमिका, वृक्षतोडीला अखेर मिळाली स्थगिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-सेवाग्राम या मार्गाचे कॉक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी १६८ झाडांपैकी आतापर्यंत ७० झाडे कापण्यात आली. मात्र, वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविल्याने आता वृक्ष वाचवून मार्ग तयार करण्यासाठी पर्यायांची शोध घेतला जात आहे. त्यामुळे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामात झाडे वाचविण्यासाठी फेरसर्व्हेक्षण सुरू केले आहे.दत्तपूर ते नालवाडी व आरती चौक ते गांधी चौक ते सेवाग्राम या १२ किलोमीटरच्या रस्त्याचे हायब्रीड अंन्युटी मोड अंतर्गत कॉक्रीट चौपदरीकरणाचे काम मंजूर असून प्रगतीत आहे. या १२ किलोमीटरच्या रस्त्याचे दरम्यान सुमारे २५०० झाडे आहेत. मात्र ही झाडे वाचविण्यात आली असून रस्त्याच्या मध्ये येणारी १७० झाडे काढणे आवश्यक आहे. यासाठी वनविभाग, सेवाग्राम आणि नालवाडी ग्रामपंचायत तसेच नगरपरिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे.सदर झाडे काढत असताना पर्यावरणाच्या मुद्यावरून सेवाग्राम मधील काही नागरिकांनी चिपको आंदोलन करीत झाडे काढण्यास तीव्र आक्षेप नोंदविला यासंदर्भात कार्यकारी अभियंता गजानन टाके यांनी नागरिकांशी दोनदा बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रेल्वे उड्डाणपूल ते डॉक्टर्स कॉलनी दरम्यान पूर्णपणे पेव्हिंग ब्लॉक लावून काही झाडे वाचविता येऊ शकतात का याबाबत सर्वेक्षण करण्याचे ठरले. सद्यस्थितीत झाडे काढण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून सर्वेक्षणानंतर जितकी झाडे वाचवता येतील तेवढी वाचविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाचे अभियंता टाके यांनी नागरिकांना दिले आहे.रस्त्याच्या रुंदीची मोजणी केली तेव्हा दुतर्फा असलेल्या झाडांमधले अंतर ११ मीटर असल्याचे दिसले. हे अंतर १० मीटर (३३ फूट) रुंद रस्ता बांधण्यास पुरेसे आहे.इतक्या रुंदीच्या रस्त्यातून तीन कार किंवा दोन बस-ट्रक सहज जाऊ शकतात. रस्त्याच्या मधोमध कोणतेही झाड येत नाही, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. वर्ध्यासारखी मोकळी पसरलेली शहरं फार कमी असतील. बंगलोर, पुणे, दिल्ली सारख्या दाट लोकवस्तीच्या शहरातही जुन्या वृक्षांना, झाडांना जपत पक्क्या रस्त्यांची बांधणी केली गेली आहे. वर्ध्यासारख्या शहरातही असे नीटनेटके नियोजन व्हावे व ते सहज शक्य आहे. अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढेल का? जगभरातील अनेक अभ्यासातून हे स्पष्ट झाले की रस्ता रुंदीकरणाने अपघातांचे प्रमाण कमी होत नाही, उलट जास्तप्रमाणात वाढलेलेच दिसते, असा दावा वृक्ष बचाव समिती कडून करण्यात आला आहे.सेवाग्राम मार्ग शांतिपथ हवागांधीजींच्या आश्रमाकडे जाणाऱ्या या रस्त्याला 'शांतिपथ' बनवित मर्यादित वेगाने वाहतूक होणे अपेक्षित आहे. आजूबाजूच्या हिरवाईमुळे रस्त्यावरील रहदारीपासून रहिवासी आणि विद्यार्थ्यांचे रक्षण होईल. एकही झाड न तोडता शक्य तितका रुंद आणि पक्का रस्ता बांधावा, रस्ता बांधणीसाठी मशीनने केलेल्या खोदकामात मोठ्या वृक्षांच्या मुळ्या उघड्या पडल्या आहेत. त्या झाडांना जगवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, सदर रस्ता दोन किंवा तीन पदरी ठेवल्यास भविष्यकालीन वाहतुकीवर परिणाम होणार नाही आणि मोठमोठी झाडेही वाचतील अशी मागणी वृक्ष बचाव समितीने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामhighwayमहामार्ग