शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाटात तब्बल ४३ वर्षांनंतर पूर पीडितांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 17:40 IST

भूमी अभिलेख उपसंचालकांच्या सूचना : लवकरच होणार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरात सन १९७९ मध्ये महापुराचे पाणी जुन्या वस्तीत शिरले होते. यात मोठी हानी झाली होती. या पूर पीडितांना पट्टे वाटप करण्यात तर आले मात्र प्रॉपर्टी कार्ड दिले नव्हते. यासाठी पूर पीडितांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर तब्बल ४३ वर्षांनी प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.

हिंगणघाट शहरात १९७९ मध्ये आलेल्या महापुराचे पाणी शहराच्या जुन्या वस्तीत शिरले होते. यात मोठी हानी झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घटनेची दखल घेत पीडित लोकांना हिंगणघाट येते सुनियोजित जागा निर्माण करून वसाहत निर्माण केली होती. अशीच एक वसाहत हिंगणघाट येथे गावठाण नांदगाव (बो) येथे निर्माण केली होती. या वसाहतीत राहणाऱ्या लोकांना सगळ्यांना पट्टे देण्यात आलेले होते. परंतु प्रॉपर्टी कार्ड देण्यात न आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी याचा लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे पाठपुरावा करून तब्बल ४३ वर्षांनंतर २६ रोजी हिंगणघाट भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंतर्गत जमाबंदी कार्यालय पुणे व उपसंचालक, भूमी अभिलेख कार्यालय नागपूर प्रदेश, नागपूर यांच्या आखिव पत्रिका तयार करून देण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसांतच आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते मालकी हक्क पत्रिका दिली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे. 

भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांनीही केले सहकार्य गेल्या ४३ वर्षांपासून पूरपीडित बांधव प्रॉर्पटी कार्डसाठी लढा देत होते. वारंवार लोकप्रतिनिधींकडे मागणी करीत होते. अखेर त्यांच्या परिश्रमाला यश आले आहे. नुकसानग्रस्तांनी वेळोवेळी ही बाब आमदारांच्याही लक्षात आणून दिली होती. आता आखिव पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) चे वितरण केले जाणार आहे. वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लागल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचा सूर उमटत आहे. वर्धा येथील भूमी अभिलेख अधीक्षक सुनील बन, हिंगणघाट भूमी अभिलेखचे उपअधीक्षक प्रवीण तांबडे, भूमी अभिलेख कार्यालयातील समस्त कर्मचारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. आमदारांनी ७९६ लोकांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असल्याचे सांगितले. याबद्दलचे पत्र उपसंचालक, भूमी अभिलेख कार्यालय, नागपूर प्रदेश, नागपूर, यांना २६ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले आहे. त्यामुळे ही समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. लाभार्थी या निर्णयामुळे समाधान व्यक्त करीत आहे. त्यांच्या जागेच्या खरेदी, विक्रीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

८५० जणांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड शहर परिसरातील पूर पीडितांसाठी नांदगाव (बोरगाव) येथे ८५० प्रॉपर्टी कार्ड घेण्याचा निर्णय झाला आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंतर्गत आखिव पत्रिका मंजूर करून देण्याचा निर्णय झाला आहे. ८५० पैकी ७९६ रहिवासी व ५४ शासकीय (खुले मैदान, शाळा, मंदिर व अन्य) चा समावेश आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा