शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

अ‍ॅफकॉन्सला २३९ कोटी रूपये भरण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 06:26 IST

३० जानेवारीपर्यंत मुदत ‘लोकमत’ च्या वृत्तानंतर केली कारवाई

वर्धा : जिल्ह्यात विनापरवानगी बेकायदेशीरपणे ३ लाख २ हजार ५२८.१२ ब्रास मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी सेलूच्या तहसीलदारांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे कंत्राट घेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला २३८ कोटी ९९ लाख ७२ हजार १४८ रूपये भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम ३० जानेवारीपर्यंत शासन खजिन्यात भरून त्याची चालान प्रत सादर करण्याचेही निर्देशही देण्यात आले आहेत.

२३८ कोटी ९९ लाख ७२ हजार १४८ रुपयाच्या रकमेसंदर्भात या कंपनीवर आधीच नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, आदेशाच्या कारवाईत दिरंगाई होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी हा आदेश जारी केला.अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमीन खोदून लाखो ब्रास गौणखनिजाची चोरी केली आहे. सेलू तालुक्यातील केळझर व खापरी (ढोणे) या शिवारातही लाखो ब्रास मुुरूम चोरल्याप्रकरणी कोझी प्रॉपर्टीजने सेलू पोलिसांसह तहसील कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे महसूल विभागाने चौकशी सुरू केली. उत्खनन केल्यासंदर्भात नायब तहसीलदारांनी अहवाल सादर केला असता त्यामध्ये मोक्यावर अंदाजे २५ ते ३० एकरामध्ये गौणखनिजाचे उत्खनन केल्याचे पंचनाम्यात नमूद केले. त्या पंचनाम्यावरून तहसीलदारांनी अ‍ॅफकॉन्सला नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते. खुलासा प्राप्त झाल्यानंतर जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्यावतीने नियुक्त केलेल्या पथकाने इटीएसद्वारे केलेल्या मोजणीनुसार ३ लाख २ हजार ५२८.१२ ब्रास गौणखनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे.अ‍ॅफकॉन्सने नेमले १९ उपकंत्राटदारअ‍ॅफकॉन्स कंपनीने सादर केलेल्या खुलाशामध्ये महामार्गाच्या कामाकरिता १९ उपकंत्राटदार नेमल्याचे स्पष्ट केले आहे. यातील एम.पी. कन्स्ट्रक्शन हा एक उपकंत्राटदार असून त्याने विनापरवानगी गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक केल्याची कबुली दिली आहे.या कंपनीला समृद्धी महामार्ग बांधण्याकरिता अंदाजपत्रकानुसार १.९० कोटी क्युबिक मीटर मुरुमाची गरज आहे. त्यापैकी १.०५ कोटी क्युबिक मीटर मुरूम त्यांना कटिंगमधून मिळणार आहे तर ०.८५ कोटी क्युबिक मीटर मुरुमाची उचल ते परवानगीप्राप्त क्षेत्रामधून करणार असल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाnagpurनागपूर