शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

३३१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमधील तब्बल ३३१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून लवकरच ते आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत. आता विनंती बदल्यांची प्रक्रिया पोलीसदप्तरी सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस दलातील प्रशासकीय बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी, यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पोलीस मुख्यालयात बदली दरबार भरविला होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्या सर्वसाधारण बदल्यांच्या अनुषंगाने पोलीस विभागातील आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पाेलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आलेल्या आहेत.जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमधील तब्बल ३३१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून लवकरच ते आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत. आता विनंती बदल्यांची प्रक्रिया पोलीसदप्तरी सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस दलातील प्रशासकीय बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी, यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पोलीस मुख्यालयात बदली दरबार भरविला होता. यावेळी प्रत्येक कर्मचाऱ्यास पसंतीचे ठिकाण विचारण्यात आले होते. यामुळे नेहमीच्या घोडेबाजाराला चांगलाच चाप बसला. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल ३३१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाची बदल्यांची यादी तयार झाली असून येत्या दोन ते तीन दिवसातच बदली झालेले कर्मचारी आपला नवीन पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. 

८४ कर्मचाऱ्यांना स्थगितीने दिलासा काही कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती जवळ असल्याने तसेच काही कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारणास्तव, कौटुंबिक कारणास्तव पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे. हे कर्मचारी ज्या ठिकाणी आहेत तेथेच त्यांनी थांबण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिले आहेत. अशा १९ पोलीस ठाण्यांतील तब्बल ८४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे. 

२० वाहनचालकांचा समावेशजिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यात असलेल्या वाहनचालकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गिरड पोलीस ठाणे, मोटार परिवहन विभाग, हिंगणघाट, वर्धा, खरांगणा, वर्धा, आर्वीच्या उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनावरील चालक, पोलीस ठाणे आर्वी, सावंगी, समुद्रपूर, हिंगणघाट, पुलगाव, स्थानिक गुन्हे शाखा आदी पोलीस ठाण्यातील अशा २० चालकांच्याही प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.

विनंती बदल्यांची कार्यवाही सुरू सध्या प्रशासकीय बदल्या आटोपल्या असून आता विनंती बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वी १५ टक्केच बदल्या करण्याचे आदेशित होते. मात्र, आता २५ टक्के बदल्या करण्यात याव्यात, असे आदेश प्राप्त झाल्याने बदली प्रक्रियेला थोडा विलंब होत आहे. मात्र, तरी देखील पसंतीचे पोलीस ठाणे मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दिलासादायक चित्र पाहावयास मिळत आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली