शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाची चांदी; तेरा महिन्यांत कमविला 67.07 कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

वाळू, मुरुम, गिट्टी, माती गौण खनिजांत मोडत असून रॉयल्टी तसेच वाळू घाटांच्या लिलावांच्या माध्यमातून मागील तेरा महिन्यांत वर्धा जिल्हा प्रशासनाला तब्बल ४५ कोटी ९१ लाख ११ हजारांचा महसूल प्राप्त झाला होत. तर पूर्वी करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळायचा. पण मागील तेरा महिन्यांत करमणूक शुल्काच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला केवळ दोन लाख एक हजारांचा महसूल मिळाल्याचे वास्तव आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा प्रशासनाला विविध माध्यमातून महसूल मिळत असून मागील तेरा महिन्यांच्या काळात तब्बल ६७.०७ कोटींचा महसूल जिल्हा प्रशासनाने गोळा केला आहे. यात सर्वाधिक महसूल गौण खनिजाच्या माध्यमातून प्राप्त झाला असून करमणूक कराच्या माध्यमातून केवळ २.०१ लाखांचाच महसूल मिळाल्याने करमणूक विभागाचे काम पूर्वीच्या तुलनेत चांगलेच ढेपाळल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.वाळू, मुरुम, गिट्टी, माती गौण खनिजांत मोडत असून रॉयल्टी तसेच वाळू घाटांच्या लिलावांच्या माध्यमातून मागील तेरा महिन्यांत वर्धा जिल्हा प्रशासनाला तब्बल ४५ कोटी ९१ लाख ११ हजारांचा महसूल प्राप्त झाला होत. तर पूर्वी करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळायचा. पण मागील तेरा महिन्यांत करमणूक शुल्काच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला केवळ दोन लाख एक हजारांचा महसूल मिळाल्याचे वास्तव आहे. तर जमीन महसूलच्या माध्यमातून मागील तेरा महिन्यांत जिल्हा प्रशासनाला २१ कोटी १४ लाख ७९ हजारांचा महसूल प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच मागील तेरा महिन्यांत जमीन महसूल व करमणूक शुल्क तसेच गौण खनिजच्या माध्यमातून तब्बल ६७.०७ कोटींचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाल्याने जिल्हा प्रशासनाची चांदीच झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

उद्दिष्ट १०७.२५ कोटी; पण प्रत्यक्ष काम ५९% -  १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षात जमीन महसूल, करमणूक शुल्क तसेच गौण खनिजाच्या माध्यमातून एकूण १०७ कोटी २५ लाख ६२ हजारांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. -  पण यंदा मार्च अखेरपर्यंत ५९.४० टक्के म्हणजे ६३ कोटी ७१ लाख ३९ हजारांचा महसूल गोळा करण्यात वर्धा जिल्हा प्रशासन यशस्वी झाल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद