शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

प्रशासनाने कडक निर्बंध वाढविला; फळे-भाजीपाला शेतातच सडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व फळे विक्री करण्यास ब्रेक लागला. त्यामुळे बेलोरा (बुजरुक) येथील ११ शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेले २६० टन टरबूज आणि खरबूज खराब झाले. बरीच फळे सडली असून ती शेताच्या बांधावर फेकावी लागली तर काही जनावरांना चारावी लागल्याने तब्बल १६ लाखांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देबेलोराच्या अकरा शेतकऱ्यांचा टाहो, २६० टन टरबूज-खरबुजाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला पाच दिवस कडक लॉकडाऊन लावला. त्यामध्ये आता पुन्हा पाच दिवसांची मुदतवाढ करण्यात आल्याने सर्व उलाढाल ठप्प झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतमाल उत्पादकांना बसला असून शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला शेताच्या बांधावर किंवा जनावरांना चारण्याची वेळ आली आहे. आधीच खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात तोट्यात गेल्यानंतर आता  उन्हाळी पिकेही लॉकडाऊनमुळे हातची गेली आहेत.कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व फळे विक्री करण्यास ब्रेक लागला. त्यामुळे बेलोरा (बुजरुक) येथील ११ शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेले २६० टन टरबूज आणि खरबूज खराब झाले. बरीच फळे सडली असून ती शेताच्या बांधावर फेकावी लागली तर काही जनावरांना चारावी लागल्याने तब्बल १६ लाखांचे नुकसान झाले. बेलोरा येथील हुकुम जाणे, उमेश अरुण जाणे, उमेश दयाराम जाणे, वीरेंद्र जाणे, गजानन जाणे, अशोक बोरवार, मनोहर गडलिंग, नकुल जाणे, अजय जाणे, सुरेश जाणे, रमेश जाणे या अकरा शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज या फळांची लागवड केली होती. उन्हाळ्यात या फळांना मोठी मागणी राहत असल्याने शेतकऱ्यांनी चांगलीच मेहनत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागाही चांगल्या बहरल्यामुळे भरघोस उत्पन्न मिळण्याची आशा पल्लवित झाली होती. मात्र, फळे तोडणीवर आल्यानंतर अचानक प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने आष्टी, आर्वी व कारंजा हे तिन्ही तालुक्यांचे ठिकाण कडकडीत बंद होते. त्यामुळे शेतमाल शेतातच पडून राहिल्याने खराब झाला. शेवटी सर्व शेतकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी फळे जनावरांना खाऊ घातली. आर्वीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना घरपोच फळे विक्री करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, तोपर्यंत या शेतकऱ्यांच्या हातून चांगली फळे निघून गेली होती. आता सडलेला माल कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

शेतकऱ्यांसाठीचे नियोजनच कोलमडलेजिल्हा प्रशासनासह जिल्हा कृषी अधीक्षक व आत्मा प्रकल्पाच्या संचालकांनी या लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्याकरिता नियोजन करणे अपेक्षित होते; परंतु कोणतेही नियोजन न करता कडक लॉकडाऊन करून त्यात मुदतवाढ केली. बऱ्याच फळ व भाजीपाला उत्पादकांचा शेतमाल खराब झाल्यानंतर घरपोच विक्री करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात सुरुवातीपासून शेतकऱ्यांना विक्री करण्याकरिता पासेस दिल्या असत्या तर ही वेळ आली नसती, असा संताप शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या नियोजनशून्यतेचा शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.

नरसुल्याच्या शेतकऱ्याचेही नुकसाननरसुला येथील शेतकरी आशिष साठोणे यांनी साडेतीन एकरामध्ये डांगर आणि खरबुजाची लागवड केली. या दोन्ही पिकांच्या लागवडीकरिता एकरी ७० हजार रुपये खर्च आला. यासोबतच या फळांना चांगले रसदार करण्यासाठी शेतकरी परिवाराने मोठे परिश्रम घेतले. फळही चांगले बहरल्याने त्यांनी विकण्याकरिता तोडणी केली. मात्र, अचानक लॉकडाऊन लागल्याने फळे शेतातच पडून आहेत. आता लॉकडाऊन वाढविल्याने सर्व फळे जागेवर खराब झाल्याने आशिष साठोणे यांना आतापर्यंत दीड लाखांचे नुकसान सहन करावे लागले. या फळांच्या विक्रीकरिता प्रशासनाने परवानगी दिली नाही, तर या नुकसानीमध्ये आणखीच भर पडणार असल्याचेही साठोणे यांनी सांगितले.

तोंडले, वांगे पिकले; चवळी जरड झालीवर्ध्यालगतच्या उमरी (मेघे) येथील वाल्मिक उघडे या शेतकऱ्याने सव्वा एकरामध्ये तोंडले, एक एकरात चवळी आणि अर्ध्या एकरामध्ये वांग्याची लागवड केली. या तिन्ही पिकांच्या विक्रीतून लॉकडाऊनपूर्वी वीस हजार रुपये एका हप्ताचे यायचे. आता पीक चांगले बहरल्याने उत्पादनही चांगले निघत आहे; परंतु बाजारपेठ बंद असल्याने विक्री करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे सध्या वांगे आणि तोंडली झाडालाच पिकली असून चवळी जरड व्हायला लागली आहे. यामुळे दर दिवसाला दहा हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

 

टॅग्स :vegetableभाज्याcorona virusकोरोना वायरस बातम्या