शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रनिर्मिती प्रक्रियेला मिळाली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:18 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी २९ जून २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांनी जागेचा ताबा देण्याकरिता प्रथम आदेश दिला. त्यानुसार १६ जुलैला सदर जागेचा ताबा मिळाला असून जागा अधिग्रहणाऱ्या अंतिम आदेशानंतर तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बांधकाम सुरू होणार आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय मंजुरीनंतर निविदा : १० गावांना लाभ होणार

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी २९ जून २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांनी जागेचा ताबा देण्याकरिता प्रथम आदेश दिला. त्यानुसार १६ जुलैला सदर जागेचा ताबा मिळाला असून जागा अधिग्रहणाऱ्या अंतिम आदेशानंतर तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बांधकाम सुरू होणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या कित्येक वर्षांपासून प्रस्तावित होते. त्यावर स्थानिक राज्यकर्त्यांचे लक्ष फक्त निवडणूक आल्यावरच पडत होते. सुरूवातीला ग्रामपंचायत तळेगावने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी हालचाली सुरू केल्या त्यासाठी नियोजीत केलेली जागा सर्वे नं. ४३/१ हे.आर. ४०.०७ मधील १ हेक्टर बी.एस.एन.एल. टॉवरला लागून असलेली काकडदरा येथील जागा ठरविण्यात आली. परंतु हा विषय बंदच पडला. त्यानंतर पुन्हा तत्कालीन सरपंच सुनिता जोरे त्याचा पाठपुरावा संबंधीत विभागाकडे केला असला तरी पाणी कुठे काय मुरत होते हे कुणालाच माहित नव्हते. त्यानंतर २१ मे २०१७ च्या स्थायी समितीमध्ये जि.प.सदस्य अंकीता होले यांनी हा मुद्दा मांडला तेव्हा ग्रामपंचायत तळेगावने जागेच्या मोजणीकरिता तेवीस हजार रूपये भूमि अभिलेख कार्यालयात भरले नसल्याने जागेची मोजणी अडकली असे त्यांना समजले तेव्हा अंकीता होले यांनी आम्ही लोकवर्गणीतून सदर जागा मोजणीची फी भरतो असे सुचविल्यानंतर स्थायी सभेने अंतीम सूचना ग्रामपंचायतला देवू असे आश्वासन दिले. त्यानंतर १९ मे २०१७ ला जि.प. सदस्य अंकीता होले यांनी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी हे तळेगावला आल्यानंतर त्यांची भेट घेवून जागा मोजणीचा प्रश्न निकाली काढला त्यानंतर ग्रा.प. ने जागा मोजणीची रक्कम भरल्यानंतर जून २०१७ ला जागेची मोजणी करण्यात आली परंतु मागील एकवर्ष प्रकरण थंड अवस्थेतच होते. तेव्हा जि.प. सदस्यांनी वेळावेळी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर आता आरोग्य केंद्रांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. निविदा प्रक्रीया प्रारंभ झाल्यानंतर किमान एक वर्षांचा कालावधीनंतर प्राथमिक आरोग्य केंंंद्राचा लाभ जनतेला मिळू शकेल. या आरोग्य केंद्राचा लाभ तळेगावसह परिसरातील १० गावांना होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल.तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सर्वप्रथम आम्हीच पुढाकार घेतला असून विद्यमान आमदार अमर काळे यांनी वरिष्ठ स्तरावर वेळावेळी याचा पाठपुरावा केला आहे. आणि त्यावेळी ग्रा.पं. तळेगावची सरपंचाकडे असल्याने कागदोपत्री सर्व पाठपुरावा मीच केला आहे.सुनीता चंद्रशेखर जोरे, माजी सरपंच, तळेगाव (श्या.पंत.)प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या जागा मोजणीची फी भरण्यास ग्रा.पं. टाळाटाळ करीत होती. तेव्हा सर्वप्रथम स्थायी समितीमध्ये हा मुद्दा ठेवून जर ग्रा.प. पैसे भरत नसेल तर लोकवर्गणीतून आम्ही पैसे भरू असे सुचविल्यानंतर ग्रा.प.ला पैसे भरण्याकरिता सांगण्यात आले आणि सर्व विषयात मी पाठपुरावा केला असून त्याचे पुरावे माझ्याजवळ असून फक्त श्रेयासाठी दवाखाना अडविणे व गरीब जनतेच्या आरोग्याशी खेळणे म्हणजे राजकारण नव्हे या विषयावर जाहीर चर्चा व्हावी.अंकीता सचिन होले, जि.प. सदस्य, तळेगाव सर्कल

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार