शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, पतीला मीच ठार मारले, मलाच शिक्षा द्या! प्रियकराच्या बचावासाठी आरोपी पत्नीचा आक्राेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 11:15 IST

पतीपासून त्रस्त दीपालीचे शुभम जाधवशी सूत जुळले. याबाबत जगदीशला माहित झाल्यावर त्याने पत्नी दीपालीशी वाद केला. त्यानंतर दिपालीने प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय यांनी मिळून जगदीशचा खून केला व मृतदेह पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

वर्धा : साहेब, ‘जगदीश’ला माझ्या प्रियकराने नव्हे, तर मीच जीवे मारले. त्याला सोडा, मला शिक्षा द्या, असा जबाब आता मृतक जगदीशची पत्नी आरोपी दीपालीने पोलिसांसमोर दिला आहे. त्यामुळे ‘जगदीश’ हत्याकांडात दररोज नवनवे खुलासे पुढे येत असून, या घटनेने मात्र, आष्टीवासीयांची झोप उडाली हे तितकेच खरे.

नवीन आष्टी येथील गवंडी कामगार जगदीश देशमुख याला त्याची पत्नी दीपाली, प्रियकर शुभम, त्याचा मित्र विजय यांनी ठार केले. पोत्यामध्ये मृतदेह भरून एका शिक्षकाच्या घरासमोर नेऊन फेकला. त्यानंतर दीपाली घरी आली. तिचा प्रियकर शुभम व साथीदार विजय हे दोघेही एका दुचाकीने पहाटे ५ वाजताच्या सुमारास आर्वीला गेले. एकीकडे सकाळ होताच पत्नी दीपाली पतीच्या शोधात हंबरडा फोडत होती. मात्र, तिचे कट कारस्थान अवघ्या काही तासांतच उघड झाले आणि पोलिसांनी दीपाली, प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय या तिघांना बेड्या ठोकल्या.

बहिण-भाऊ म्हणून राहायचे दोघेही एकत्र

मृतक जगदीशची पत्नी दीपाली आणि प्रियकर शुभम हे दोघे आर्वीत काही महिने राहिले. किरायाच्या खोलीत ते बहीण-भाऊ असल्याचा बनाव करून शिक्षणासाठी राहात असल्याचे घरमालकाला सांगितले होते. मात्र, दोघांची अनैतिक वागणूक घर मालकास व परिसरातील लोकांना जाणवल्याने त्यांनी तातडीने रूम खाली करून मागितली. त्यानंतर दीपालीने आष्टीला येऊन जगदीशकडेच राहण्याचा निश्चय केला.

मृतकाच्या जीवलग मित्रानेच केला घात

मृतक जगदीश आणि आरोपी प्रियकर शुभम हे दोघेही जीवलग मित्र होते. मात्र, शुभमने जगदीशला मद्याच्या व्यसनात गुंतवून ठेवत त्याची पत्नी दीपालीशी जवळीक साधून प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि जगदीशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. शुभमने मदतीसाठी विजय माने याला सोबत घेतले.

आरोपी शुभम अन् विजय मामा-भाचे

आरोपी शुभम जाधव याच्यासोबत मिळून आरोपी दीपाली देशमुख यांनी जगदीशला संपविण्याचा कट रचला. मात्र, दोघाकडून हे काम अवघड असल्याचे समजताच त्यांनी विजय माने यालाही त्यांच्या कटात सहभागी करून जगदीशला कायमचे संपविले. आरोपी शुभम जाधव आणि आरोपी विजय माने हे नात्याने मामा-भाचे लागतात.

संबंधित बातमी - पत्नीच्या हाताला प्रियकराची साथ अन् ‘जगदीश’चा केला घात !

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारArrestअटक