शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा पोलिसांना ३,४०० रुपयांची टोपी देणारा आरोपी ठाण्यातून अटक

By चैतन्य जोशी | Updated: April 11, 2023 19:37 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

वर्धा :पोलिस अधीक्षक साहेबांचा गोपनीय बातमीदार आहे, असे सांगून चक्क पोलिसांनाच ३ हजार ४०० रुपयांची टोपी देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला ठाणे शहरातील इंदिरानगर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून मोबाईलसह रोख रक्कम असा एकूण २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.योगेंद्रकुमार अतुलभाई सोलंकी रा. इंदिरानगर ठाणे, असे अटक आरोपीचे नाव आहे.

मी पोलिस अधीक्षक साहेबांचा गोपनीय बातमीदार असल्याचे सांगत रामनगर परिसरात मोठा जुगार सुरु असून जुगारच्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवायचा आहे. त्याला एक साधा मोबाईल विकत घेऊन द्यायचा असल्याने ३ हजार ४०० रुपये माझ्या खात्यावर टाका, असे आरोपीने सांगितले होते. पोलिसांनी आरोपीच्या फोन पे खात्यावर पैसे पाठविले. पैसे मिळताच आरोपी योगेंद्रकुमारने फोन बंद करुन पोलिसांचीच फसवणूक केली. याप्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलमार्फत करण्यात आला. आरोपीबाबत तांत्रीक माहिती हस्तगत केल्यानंतर आरोपी हा ठाणे शहर परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वे तत्काळ पोलिस पथक ठाणे येथे रवाना झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी योगेंद्रकुमार यास ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात यशवंत गोल्हर, रामकिसन इप्पर, अनुप कावळे यांनी केली.

सतत चार दिवस पोलिसांनी रचला सापळा

वर्धा पोलिसांनी ठाणे परीसरातील वेगवेगळया ठिकाणी सतत चार दिवस सापळा रचला. मात्र, आरोपी पोलिसांना हुलकावनी देऊन पसार होत होता. पोलिसांनी आरोपीवर सतत पाळत ठेवुन ठाणे परीसरातील रंगोली साडी सेंटर, स्टेशन रोड परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्याकडून २ मोबाईल, ३,२०० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाची यादीपोलिसांनी आरोपी योगेंद्रकुमार याला ताब्यात घेत त्याला पोलिसी हिसका दाखविला असता त्याने सांगितले की, संपूर्ण राज्यात पोलिस अधिकाऱ्यांना फोन करुन जुगाराचा मोठा अड्डा तसेच विदेशी पिस्तुलची बातमी देतो, अशी बतावणी करुन पैसे उकळत असल्याची कबूली त्याने दिली. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता मोबाईलमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाची यादीच आरोपीकडे असल्याचे पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

टॅग्स :wardha-acवर्धाPoliceपोलिसfraudधोकेबाजी