शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपीला केली बिहार राज्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:25 IST

आरंभा येथील समीर देवतळे याची तेथीलच दोघांनी चाकूने मारहाण करून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला समुद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी दुसरा आरोपी घटनेच्या दिवशीचीच पसार झाला होता.

ठळक मुद्देसमीर देवतळे हत्याप्रकरण : समुद्रपूर पोलिसांची कारवाई; आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : आरंभा येथील समीर देवतळे याची तेथीलच दोघांनी चाकूने मारहाण करून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला समुद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी दुसरा आरोपी घटनेच्या दिवशीचीच पसार झाला होता. त्या आरोपीला समुद्रपूर पोलिसांनी बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. जॉकी भोसले (२०), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्याची सोमवार ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविल्याचे पोलिसांनी सांगितले.समीर देवतळे याला जुन्या वादाचा काढण्यासाठी आरंभा येथील दोघांनी चाकूने मारहाण केली. यात समीर गतप्राण झाला. सदर प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होताच जॉकी गावसोडून पसार झाला. दरम्यान समुद्रपूर पोलिसांनी घटनेतील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्या घेवून न्यायालयाच्या आदेशान्वये त्याची बालसुधार गृहात रवानगी केली. गुन्हा दाखल झाल्यापासून समीर देवतळे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जॉकीचा शोध घेत होते. समुद्रपूर पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील विविध गावांसह शेजारच्या नागपूर जिल्ह्यात जॉकीचा शोध घेतला; पण तो समुद्रपूर पोलिसांना गवसत नव्हता. दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलिसांच्या चमुने बिहार राज्यातील भागलपूर येथे ठाण मांडून जॉकीला अटक केली. ज्या भागातून जॉकीला अटक करण्यात आली तेथून नेपाळची सीमा जवळ आहे. त्याने नातेवाईकाकडे आश्रय घेतला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे, ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलींद पारडकर, यशवंत गोल्हर, रवी वर्मा, सचिन रोकडे, स्वप्नील वाटकर, अशोक चहांदे, राजु जैयसिंगपूरे, अमोल खाडे, अजय घुसे, वीरेंद्र कांबळे यांनी केली.पारधी बेडे काढले पिंजूनसमुद्रपूर पोलिसांनी वर्धा, नागपूर जिल्ह्यातील अनेक पारधी बेडे जॉकी भोसलेच्या शोधार्थ पिंजुन काढले होते; पण तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्यानंतर आरोपी हा बिहार राज्यात असल्याची माहिती मिळल्याने पोलीस उपनिरीक्षक मिलींद पारडकर यांच्या चमूने तेथे जाऊन त्याला मोठ्या शिताफीने अटक केली.१,२०० झोपड्यांमध्ये घेतला शोधसदर पथकाने भागलपूर शहर, खदरा, तितरी, शाहुक पर्वता, फत्तेपुर या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण आरोपी चतुरच होता. तो आपले ठिकाण वारंवार बदलवित होता. दरम्यान आरोपी तितरी गावात लपून असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथील सुमारे १ हजार २०० झोपड्यांमध्ये त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून