शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या हाताला प्रियकराची साथ अन् ‘जगदीश’चा केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

पतीपासून त्रस्त दीपालीचे शुभम जाधव याच्याशी सूत जुळले. याची माहिती जगदीशला झाल्याने त्याने पत्नी दीपालीशी वाद केला. अखेर मध्यरात्री पत्नी दीपाली, प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय यांनी मिळून जगदीशच्या डोक्यावर सेंट्रिंगच्या पाटीने जबर वार करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने वार करीत जगदीशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : पती-पत्नीत वारंवार खटके उडू लागले. अशातच पत्नीचे दीड वर्षांपूर्वी एका युवकाशी सूत जुळले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे पतीला माहिती झाले अन् दोघांत वाद सुरू झाला. आता पतीला संपवायचेच. असे मनात ठासून अखेर प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीला धारदार शस्त्राने मारहाण करीत हत्या करून मृतदेह पोत्यात भरून घराच्या अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या शिक्षकाच्या घरासमोर नेऊन फेकला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री  १ ते १.३० वाजताच्या सुमारास घडली. शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याने या हत्याकांडाने आष्टी शहर मात्र हादरून गेले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांनाही अटक केल्याची माहिती दिली. जगदीश भानुदास देशमुख (३८, रा. नवीन आष्टी) असे मृतकाचे नाव असून, पत्नी दीपाली देशमुख (३२), प्रियकर शुभम जाधव (२२), साथीदार विजय माने (२१) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. मृतक जगदीश देशमुख हा गवंडी कामगार होता. त्याचा विवाह दीपालीसोबत झाला होता. त्याला पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. पण, जगदीशला दारूचे व्यसन  जडले होते, त्यामुळे  जगदीश आणि दीपालीमध्ये वारंवार खटके उडत होते. याच कारणाने पत्नी दीपाली ही माहेरी निघून गेली होती.  परत आली असता  जगदीश आणि दीपाली हे दोघे वेगळे राहू लागले. पतीपासून त्रस्त दीपालीचे शुभम जाधव याच्याशी सूत जुळले. याची माहिती जगदीशला झाल्याने त्याने पत्नी दीपालीशी वाद केला. अखेर मध्यरात्री पत्नी दीपाली, प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय यांनी मिळून जगदीशच्या डोक्यावर सेंट्रिंगच्या पाटीने जबर वार करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने वार करीत जगदीशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिला.  घटनास्थळी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांसह स्थानिक गुन्हे शाखेची चमू दाखल झाली होती.

शिक्षकाची सतर्कता अन् पोलीस अलर्ट-    शिक्षक दिनेश टेकाडे हे पहाटेच्या सुमारास वॉकला निघाले असता त्यांना रस्त्याकडेला पोते दिसून आले.  त्यांनी पोत्याला हात लावला असता त्यांच्या हाताला नरम काही तरी लागल्याने याची माहिती त्यांनी गृहरक्षक उमेश धानोरकर यांना दिली. उमेशने पोत्याची पाहणी केली असता मृतदेह दिसून आला. त्याने याची माहिती ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांना दिली. 

शहराबाहेर मृतदेह फेकण्याचा होता प्लॅन-    जगदीशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून नवीन आष्टी शहराच्या बाहेर फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा बेत तिन्ही आरोपींनी आखला होता. मात्र, अज्ञात व्यक्तीने तिघांना पाहिल्याने आरोपींनी शिक्षक दिनेश टेकाडे यांच्या घराजवळ असलेल्या गल्लीत पोत्यात भरलेला मृतदेह फेकून दिला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस