शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दारू भरलेल्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:43 IST

येथील सेवाग्राम मार्गावरील गोल्हर सभागृहाजवळ दारू भरलेल्या वाहनाला अपघात झाला. यावेळी वाहनचालक पसार झाला. या अपघाताची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी वाहनातील दारूची लूट केली.

ठळक मुद्देचालक पसार : नागरिकांकडून दारूची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : येथील सेवाग्राम मार्गावरील गोल्हर सभागृहाजवळ दारू भरलेल्या वाहनाला अपघात झाला. यावेळी वाहनचालक पसार झाला. या अपघाताची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी वाहनातील दारूची लूट केली. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास सेवाग्राम मार्गाने भरधाव वेगाने नागपूरकडून दारूच्या पेट्या भरून येत एम.एच.२३ ऐ.डी.९१५१ क्रमांकाचे वाहन येथील एका सभागृहाजवळील वळणावर उलटले. यावेळी अंधाराचा फायदा घेत वाहन चालक जखमी अवस्थेत पसार झाला.या अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेत वाहनात असलेल्या दारूची चांगलीच लूट केली. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता त्यांच्या हाथी फक्त नागरिकांच्या हातातुन जमिनीवर पडलेल्या दारूच्या बाटल्या लागल्या. यावेळी पोलिसांनी पलटी झालेले वाहन आपल्या ताब्यात घेवून एकूण सात लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर करवाई एएसआय उमेश हरनखेडे, मनोहर मुुंदे यानी केली. अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. असे असले तरी पोलिसांना अद्याप सुगारा लागला नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Accidentअपघात