लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील शिवनी येथील शेतात काम करण्याकरिता जात असलेला ट्रॅक्टर उलटला. यात ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबयाने चालकाचा मुत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. रवींद्र प्रमोद काळे (२५) रा. शिवनी असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, रवींद्र प्रमोद काळे हा ट्रॅक्टर घेवून शेतात कामाकरिता जात होता. दरम्यन शिवनी शिवारात त्याच्या ट्रक्टरच्या समोरील सायलेनसरला अटकून लोबंत्या जिवंत विद्युत तारा तुटल्या. याच वेळी त्याला विजेचा जबर धक्का बसला. यात दचकल्याने त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. यावेळी ट्रॅक्टरमधून उडी घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच याच ट्रक्टरच्या चाकाखाली दबुन रवींद्रचा मृत्यू झाला. .घटनेची माहीती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्याला चाकाचे बाहेर काढण्या पुर्वीच त्याचा मुत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला व शव विच्छेदनाकरिता मृतदेह समुुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात पाढविला. या घटनेची समुद्रपूर पोलिसांनी नोंद घेतली आहे.
ट्रॅक्टर उलटल्याने अपघात; युवकाचा दबून मुत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:59 IST
लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील शिवनी येथील शेतात काम करण्याकरिता जात असलेला ट्रॅक्टर उलटला. यात ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबयाने चालकाचा मुत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. रवींद्र प्रमोद काळे (२५) रा. शिवनी असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, रवींद्र प्रमोद काळे हा ट्रॅक्टर घेवून शेतात कामाकरिता जात होता. दरम्यन ...
ट्रॅक्टर उलटल्याने अपघात; युवकाचा दबून मुत्यू
ठळक मुद्देशिवणी येथील घटना