शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला १५० टक्के भाव वाढीचे कायम धोरण स्वीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:07 IST

शेतकऱ्याला सुलभ व सोपी कर्जमुक्ती ही रास्त व प्रासंगीक मागणी आहे. मात्र, तो नेहमीचा उपाय होणे शक्य नाही. उत्पादन खर्चाच्या हिशोबात खर्चाचे अनेक मुद्दे न धरता सरळ सरळ आधारित खर्चाच्या १५० टक्के भाव मिळायला हवा.

ठळक मुद्देमागणी : केंद्र सरकारच्या धोरणावर टीका

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्याला सुलभ व सोपी कर्जमुक्ती ही रास्त व प्रासंगीक मागणी आहे. मात्र, तो नेहमीचा उपाय होणे शक्य नाही. उत्पादन खर्चाच्या हिशोबात खर्चाचे अनेक मुद्दे न धरता सरळ सरळ आधारित खर्चाच्या १५० टक्के भाव मिळायला हवा. दरवर्षी मागणीची गरज न ठेवता राष्ट्रीय वेतन आयोगाप्रमाणे तिची अंमलबजावणी करावी, हे धोरण कायम स्वरूपी अंगीकारण्याची मागणी वर्धेतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.१३० कोटी लोकांचा अन्नदाता प्रचंड प्रमाणात संकटात सापडला आहे. शेतकºयाला त्याच्या घामाचे, भांडवलाचे व कौशल्यात्मक बौद्धीक मॅनेजमेंटचे दामही मिळत नाही. नफा तर दूर जवळपास ३० लाख शेतकºयांनी आत्महत्या केल्या. एकाच शेतकरी कुटुंबात तीन-तीन आत्महत्या झाल्या आहे. याची दाहकता केंद्रीय कापूस संशोधन संस्था पंजाबराव कृषी विद्यापीठ, स्वामीनाथन यांच्या नेतृत्वातील किसान राष्ट्रीय आयोग, डंकेल प्रस्ताव, गॅट करार आदीतून सिद्ध झाली आहे. भारतीय शेतकºयांवर ६९ टक्के ऊणे सबसीडी लादली जाते. सरकार ठरवून सवरून ६९ टक्क्यांनी शेती क्षेत्राला लुटत आहे. इतके करूनही शेतकऱ्यांना मिंधे बनविणारी कर्जमाफी देण्याचा आव आणला जातो. २०१६-१७ मध्ये ८१ हजार कोटींची कर्जमाफी तर २०१२ पासून पाच वर्षात उद्योग क्षेत्राला २५० हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली. यावरून शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे अशोक बंग, अतुल शर्मा, डॉ. उल्हास जाजू, सुषमा शर्मा, करूणा फुटाणे, ओजस, मालती, भरत महोदय, निरंजना मारू, स्वाती सगरे, डॉ. आलोक बंग, किशोर, डॉ. सोहम पंड्या, अनिल फरसोले आदींचे मत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी