शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

जागा मुबलक; पण विद्यार्थी संख्या अल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:00 AM

कोविड-१९ च्या प्रकोपामुळे यावर्षी दहावीचा निकाल चांगलाच लांबला होता. अखेर आठवड्याभरापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना भरमसाठी गुण प्राप्त झाले. यावर्षी जिल्ह्याचा निकाल तब्बल ९२.१० टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत २६.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून १६ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता अर्ज केले होते.

ठळक मुद्दे अकरावी प्रवेश प्रक्रिया : कनिष्ठ महाविद्यालयातील जागा राहणार रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने जागाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्या तुलनेने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील १३६ कनिष्ठ महाविद्यालयात विविध शाखेच्या २३ हजार ३०० जागा असताना यावर्षी १५ हजार ४१९ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल ७ हजार ८८१ जागांवर पाणी सोडावे लागणार आहेत.कोविड-१९ च्या प्रकोपामुळे यावर्षी दहावीचा निकाल चांगलाच लांबला होता. अखेर आठवड्याभरापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना भरमसाठी गुण प्राप्त झाले. यावर्षी जिल्ह्याचा निकाल तब्बल ९२.१० टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत २६.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून १६ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता अर्ज केले होते. त्यापैकी १६ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १५ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयात कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अभ्यासक्रमाच्या २३ हजार ३०० जागा आहेत.पण, उत्तीर्ण झालेल्यांची संख्या केवळ १५ हजार ४१९ आहेत. यापैकी बरेच विद्यार्थी एमसीव्हीसी व्होकेशनल, पॉलिटेक्निक, आयटीया किंवा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार आहेत.परिणामी यावर्षीही कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्याची मोठी कसरत करावी लागणार आहेत. तरीही कनिष्ठ महाविद्यालयातील बऱ्याच जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहेत.अशी आहे प्रवेश प्रक्रियादहावीचा निकाल लागला असून अद्याप नागपूर विभागीय मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका प्राप्त झाल्या नाहीत. पण, निकाल जाहीर झाल्यानंतर कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी व्होकेशनल, तंत्रनिकेतन यासह इतरही विभागाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. शासनाने यावर्षी अकरावीच्या प्रवेशाकरिता आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया 11३ँंे्रि२२्रङ्मल्ल.ङ्म१ॅ.्रल्ल या संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता काही महाविद्यालयातही प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.जिल्ह्यामध्ये ८० अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयेजिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये एकूण १३६ कनिष्ठ महाविद्यालये असून यामध्ये ८० कनिष्ठ महाविद्यालये अनुदानित आहे. तर २१ कनिष्ठ महाविद्यालये विना अनुदानित, ०८ कायम विनाअनुदानित आणि २७ कनिष्ठ महाविद्याये स्वयं अर्थसहाय्यित आहेत. सर्वाधिक ४१ कनिष्ठ महाविद्यालये एकट्या वर्धा तालुक्यात आहे. त्यानंतर हिंगणघाट तालुक्यात २३ तर देवळी तालुक्यामध्ये २१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. सर्वात कमी आष्टी आणि कारंजा तालुक्यात कनिष्ठ महाविद्यालये आहेत.विज्ञान शाखेकडे कलविज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने प्रवेशासाठी जाती सवर्गनिहाय निकष लावण्यात आले आहे. यामध्ये एससी प्रवर्गाकरिता १३ टक्के, एसटी प्रवर्गाकरिता ७ टक्के, व्हीजेएनटीकरिता ११ टक्के (व्हीजे-अ ३ टक्के, एनटी-बी २.५० टक्के, एनटी-सी ३.५० टक्के, एनटी-डी २ टक्के), एसबीसी २ टक्के, ओबीसी १९ टक्के तर ओपनकरिता ४८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहे. एमसीव्हीसी व्होकेशनलसाठीही हेच निकष लावण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय