हिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावकरील नंदोरी चौकात मनोहर गिल्लोरकर यास जबर मारहानीनंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फरार आरोपी पालिकेचे नगरसेवक व मनसेचे सदस्य अनिल भोंगाडे याला हिंगणघाट पोलिसांनी मंगळवारी अटक केली.प्राप्त माहितीनुसार १९ मार्च २०१४ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान मनोहर गिल्लोरकर (४०) यांना आरोपी अनिल भोंगाडे व अन्य काहींनी जबर मारहाण केली होती. यात मनोहर गंभीर जखमी झाल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात १४ एप्रिल २०१४ ला त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी भांदवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून एकास अटक केली होती. परंतु याप्रकरणातील आरोपी अनिल भोंगाडे तेव्हापासून फरार होता. त्याला आज नगरपरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी आला असता अटक केली. स्थानीक तुकडोजी वार्डातील नंदोरी चौकात हेड कॉन्स्टेबल मुडे व शिपाई सुधीर पांजळे यांनी त्यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)
फरार नगरसेवक अनिल भोंगाडे याला अटक
By admin | Updated: July 23, 2014 00:07 IST