शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अबब... दारुबंदी जिल्ह्यात 1 कोटी 25 लाख 89 हजारांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुची विक्री केली जाते. दारु विक्रीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहेत. मात्र, केवळ पोलिसांकडूनच शहरातील दारु विक्रेत्यांवर कारवाई केली जात असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  वर्धा जिल्ह्याला थोर पुरुषांचा वारसा लाभल्याने जिल्हा दारुबंदी म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, तरीही वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारुची वाहतूक तसेच विक्री होताना दिसते. याच दारुबंदी जिल्ह्यात मागील वर्षभरात केवळ वर्धा उपविभागातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करत २० हजार ५१३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल १ कोटी २५ लाख ८९ हजार रुपयांचा देशी, विदेशी दारुसाठा पोलिसांनी जप्त करत सुमारे दीडशेवर दारु विक्रेत्यांना बेड्या ठोकल्याची माहिती आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुची विक्री केली जाते. दारु विक्रीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहेत. मात्र, केवळ पोलिसांकडूनच शहरातील दारु विक्रेत्यांवर कारवाई केली जात असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. वर्धा उपविभागात येणाऱ्या वर्धा, रामनगर, सावंगी, सेवाग्राम, दहेगाव, सेलू तसेच सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या हद्दीत कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा दारुसाठा हस्तगत करत दारु विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात कारवाई केल्या जात आहे.

वाहनांसह १.१८ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत- पोलिसांनी मागील वर्षभरात जप्त केलेल्या दारुसाठ्यासह विविध प्रकारच्या दारुची वाहतूक करणारे वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण १ कोटी १८ लाख ३१ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, ही जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. 

गांजाचे झुरके ओढणारे २८ गुन्हेगार जेरबंद - गांजा किंवा तत्सम प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करणे तसेच त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा असल्याने पोलिसांनी गांजाचे झुरके ओढणाऱ्या २८ जणांना पोलिसी हिसका दाखवून अटक केली आहे. तसेच विक्रेत्यांवरही कारवाई केली आहे. 

३००वर जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या - मागील वर्षभरात वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात सातही पोलीस ठाण्यांतील पोलिसांनी जुगाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ३४२ गुन्हे दाखल करुन सुमारे ३००वर जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच २४ लाख ४२ हजार १०१० रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. 

शस्त्र बाळगणाऱ्या १०३ जणांवर कारवाई - शस्त्राच्या धाकावर नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या तसेच शिवीगाळ करणाऱ्या तब्बल १०३ गावगुंडांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.  

 

टॅग्स :liquor banदारूबंदी