शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक, तीन जण जागीच ठार

By चैतन्य जोशी | Updated: April 2, 2023 07:56 IST

जाम पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे आपल्या कर्मचाऱ्यांसह अपघात स्थळी पोहोचून पंचनामा करीत वाहतूक सुरळीत केली.

वर्धा : यवतमाळकडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकवर कारने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिला डॉक्टरांसह एक जण जागीच ठार झाले. हा अपघात मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गावर झाला. जाम पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे आपल्या कर्मचाऱ्यांसह अपघात स्थळी पोहोचून पंचनामा करीत वाहतूक सुरळीत केली. डॉक्टर ज्योती क्षीरसागर, डॉक्टर फाल्गुनी, भरत क्षीरसागर अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एम एच 04, डी एल. 8235 क्रमांकाचा ट्रक यवतमाळ कडून नागपूरकडे जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एम एच 37जी.3558 क्रमांकाच्या व्हॅगनार कारने या धावत्या ट्रकला जबर धडक दिली. या भीषण अपघातात कार मधील तिघेही जागीच ठार झाले. 

जाम पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार ही महिला चालवत होती अशी माहिती आहे. अंधारात समोरील ट्रक दिसला नसल्याने अति वेगात असलेल्या कारच्या स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. सेलू पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेली आहे.

टॅग्स :Accidentअपघात