शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 18:05 IST

Wardha : प्रतीक्षा दापूरकर आष्टी येथे कार्यकर्ता संवाद, प्रशिक्षण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद.): अंधश्रद्धांचे पारंपरिक आणि आधुनिक प्रकार निर्माण झाले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आजही आव्हानात्मक आहे. समाजाला अधिकाधिक वैज्ञानिक दृष्टिकोन दिल्यास अंधश्रद्धांमधून मुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षा प्रतीक्षा दापूरकर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आष्टी शाखेने एकदिवसीय कार्यकर्ता संवाद, प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. यावेळी अंनिस वर्धा जिल्हा प्रशिक्षण विभागाच्या कार्यवाह माधुरी झाडे, हरिश पेटकर यांनी नव्याने कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

जुन्या पारंपरिक अंधश्रद्धा अजूनही समाजात आहेतच, पण अत्याधुनिक स्वरूपातील अंधश्रद्धाही लोकांच्या मनगुटीवर बसलेल्या आहेत. त्यामुळे बनला आहे. त्याच्या निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाची आवश्यकता, गरज अधोरेखित करून तो समाजात रूजविल्यास लोक तार्किक विचार करू लागतील आणि अंधश्रद्धांच्या आहारी जाणार नाहीत, असे मत हरिश पेटकर यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामांमध्ये पुरुषांसोबतच महिलांचा अधिक सहभाग असल्यास अंधश्रद्धेतून महिलांचे होणारे शोषण, मानसिक आजारपण, नैराश्य, हिंसा अशा विविध समस्यांमधून सुटका होईल, असे मत डॉ. माधुरी झाडे यांनी व्यक्त केले. 

यावेळी शाखा कार्याध्यक्ष प्रतीक्षा दापूरकर, मोरेश्वर गायकी, तसेच वरूड शाखेचे कार्याध्यक्ष शंतनू पांडव उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान अंधश्रद्धा म्हणजे काय? 'अंधश्रद्धेचे प्रकार परिणाम' यावर माधुरी झाडे यांनी विस्तृत मांडणी केली. संघटनेची कार्यपद्धती सांगितली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची पंचसूत्री हरिश पेटकर यांनी सांगितली, प्रतीक्षा दापूरकर यांनी संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा वारसा याविषयी मांडणी केली. संत सुधारकांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा मोठा विचार वारसा असून, तो कृतिशील करण्याची गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजमनात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. याबद्दल अंनिसचे कौतुक केले आणि सर्वांचे आभार व्यक्त केले.

चमत्काराच्या प्रयोगाचे केले सादरीकरणआधुनिक जमान्यातही चमत्का- रावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हातचलाखी करून चमत्काराचे प्रयोग दाखवून विविध कारणे समोर करून सर्व- सामान्यांत भीती घातली जाते. या हातचलाखीमागे केवळ आणि केवळ विज्ञान आहे. अशा चमत्काराच्या प्रयोगाचे सामूहिक सादरीकरण करून त्यामागील वैज्ञानिक कारणांचा उलगडा करण्यात आला, प्रशिक्षणार्थीनी समाज, शाळा, महाविद्याल- यांमध्ये विविध उपक्रम राबवून अंधश्रद्धा निर्मूलनात हातभार लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

टॅग्स :wardha-acवर्धा