शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर बोलताना मजुरास उच्चदाब वाहिनीचा स्पर्श, गंभीर दुखापत

By चैतन्य जोशी | Updated: April 19, 2023 16:25 IST

जखमीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार : सुकळी गावातील घटनेने खळबळ

वर्धा : मोबाईल फोनवर बोलत बोलत घराच्या छतावर गेलेल्या मजुराला छतावरुन गेलेल्या उच्चदाब वाहिनीचा स्पर्श झाल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना सेलू तालुक्यातील सुकळी परिसरात १९ रोजी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास घडली.

जखमी मजुरावर सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पंकज ब्रिजलाल पंधराम (२२) रा. सावली टोला ता. कुरई जि. शिवणी असे जखमी मजुराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सेलू तालुक्यातील सुकळी नजीक असलेल्या आरामशीन परिसरात मध्यप्रदेशातून काही मजूर लाकूड कटाईच्या कामानिमित्त वास्तव्यास आले आहेत. सहा मजूर सकाळीच घोराड येथे कामानिमित्त निघून गेले होते. तर पंकज आणि त्याच्या सोबत आणखी एक मजूर हे दोघे आरामशीन परिसरातच थांबले होते. पंकजला कुणाचातरी फोन आल्याने तो मोबाईलवर बोलत बोलत छातावर गेला. मोबाईलवरुन बोलत असतानाच छतावरुन गेलेल्या उच्चदाब वाहिनीच्या प्रवाहित वीजतारांना त्याचा स्पर्श झाल्याने तो छतावरुन खाली जमिनीवर पडला.

या दुर्घटनेत पंकजच्या हातांच्या बोटांना, चेहऱ्याला तसेच पायांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी पंकजला सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात नेले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास सेवाग्राम येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा