शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

काकडदरा परिसरात साकार होणार तीनशे खाटांचे शासकीय रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 18:42 IST

प्रशासनाकडून जागेला मंजुरी : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, आरोग्य यंत्रणा होणार सुदृढ

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी/तळेगाव (श्या. पत.): राज्य शासनाने अमरावती-नागपूर या महामार्गावरील तळेगाव (श्याम. पंत) या ठिकाणी ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर करून आर्वी विधानसभेतील नागरिकांना दिवाळीची भेट दिली होती. त्यानंतर या रुग्णालयाकरिता जागेचा शोध सुरू होता. अखेर तळेगावलगतच्या काकडदरा येथील दहा हेक्टर जागेला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाल्याची माहिती लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांनी दिली.

आर्वी विधानसभा मतदारसंघात आर्वी तालुक्यासह कारंजा आणि आष्टी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या मतदारसंघातील तळेगाव (श्याम. पंत) हे महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे शासकीय रुग्णालयाची मागणी होती. याकरिता पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने ३०० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी देत दिवाळीमध्ये आरोग्यदायी भेट दिली होती. त्यानंतर या शासकीय रुग्णालयाकरिता जागेचा शोध सुरू झाला. जागेची पाहणी झाल्यानंतर तळेगावलगतच्या काकडदरा येथील जागा निश्चित करण्यात आली असून, त्या जागेच्या मंजुरीचा आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंजूर करून आर्वीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत आष्टीच्या तहसीलदारांना देण्यात आला.

त्या आदेशानुसार काकडदरा येथील शासकीय सर्व्हे क्रमांक ४३/१ आराजी ४०.०७ हेक्टर आरमधील १० हेक्टर आर म्हणजेच २५ एकर जागा देण्यास मंजुरी दिली आहे. ही जागा ३०० खाटांचे सामान्य रुग्णालय बांधण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सकांना मंजूर केल्याचे आदेशात नमूद केले आहे.

लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नाने आधीच ३०० खाटांच्या शासकीय रुग्णालयाला मंजुरी व आता त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेला मंजुरी मिळाल्याने रुग्णालयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. येत्या काही दिवसांत शासनाकडून निधी उपलब्ध करून घेत रुग्णालयाच्या कामालाही लवकरच गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. या शासकीय रुग्णालयामुळे आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यांसह नागपूर व अमरावती जिल्ह्यातील तालुक्यांनाही आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. ३०० खाटांचे रुग्णालय होणार असल्याने नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे, हे खरच.

"नागरिकाच्या मागणी अंती पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने तळेगाव (श्याम. पंत) येथे ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर केले. त्यानंतर जागेचाही प्रश्न आता निकाली निघाला आहे. या रुग्णालयाकरिता काकडदरा येथील दहा हेक्टर जागा मंजूर केली आहे. हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, आता शासनाने निधी मंजूर केला की या कामाला झपाट्याने सुरुवात होईल."- सुमित वानखेडे, वर्धा, लोकसभा प्रमुख

टॅग्स :wardha-acवर्धा